MUMBAI

Maharashtra Live News : “शिवरायांचा असा अपमान मुघलांनीही केला नाही”; पुतळा कोसळण्यावरून संजय राऊतांची शिंदे सरकावर टीका

Maharashtra Dahi Handi Celebration Live Updates, 27 August 2024 : कृष्णजन्माष्टमी नंतर आज राज्यात दहीहंडीचा उत्साह बघायला मिळतो आहे. त्यासाठी गोविंदा पथक सज्ज झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आज मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे भरपावसात दहीहंडीचा थरार बघायल मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय काल मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरून राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. यासह इतर घडामोडींकडेही आपलं लक्ष राहणार आहे. चंद्रपूर: जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत कल्पना चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरण, सेवानिवृत्ती उपदान, वैद्यकीय देयके, वरिष्ठ वेतन श्रेणीची प्रकरणे, निवड श्रेणीची प्रकरणे, मृत कर्मचाऱ्यांचे गट विमाचे लाभ, वैयक्तिक मान्यतेची प्रकरणे अशी अनेक प्रकरणे प्रलंबित ठेवणे. सविस्तर वाचा ठाणे : अपुरा पाणी पुरवठा, कचरा विल्हेवाटी संबंधिच्या समस्या आणि दररोज होणाऱ्या अजस्त्र अशा वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना ठाण्यातील प्रशासकीय यंत्रणांना अक्षरश: घाम फुटला असतनाच, ठाणे ते ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या कामामुळे या यंत्रणाचा ताप आणखी वाढणार आहे. या कामासाठी दररोज तीन ते चार लाख लीटर पाणी लागणार आहे. सविस्तर वाचा मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाचा शीव, प्रतीक्षा नगर येथील अंदाजे २,६०० चौरस मीटरचा भूखंड सहकार भवनाच्या उभारणीसाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेस देण्यात आला आहे. यासाठी मुंबई जिल्हा बँकेला कोणतीही रक्कम मुंबई मंडळाला अदा करावी लागणार नाही. मात्र भूखंडाच्या बोली रकमेनुसार २५ कोटी रुपये मूल्याचे २०३४ चौरस मीटरचे बांधीव क्षेत्र सहकार भवनाच्या इमारतीत उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. सविस्तर वाचा ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा महत्वाचा स्त्रोत असलेल्या स्टेम प्राधिकरणाकडून दैनंदिन देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा बुधवारी २४ तासांसाठी बंद राहणार आहे. या काळात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून ठाणे महापालिका स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठा सुरू ठेवणार असून त्याचे विभागवार नियोजन करण्यात आल्याने ठाणेकरांना २४ ऐवजी १२ तास पाणी बंदचा सामना करावा लागणार आहे. सविस्तर वाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यावरून संजय राऊतांनी शिंदे सरकावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांनी मर्जीतल्या लोकांना या पुतळ्याच्या बांधकामाचं कंत्रात दिलं होतं. या कामात भ्रष्टाचारा झाला आहे. हा पुतळा पडल्यानंतर शिंदे सरकारच्या चेहऱ्या थोडं दुख दिसत नव्हतं. शिवरायांचा असा अपमान मुघलांनीही केला नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मुलाबरोबर असलेल्या दोन मित्रांच्या रक्ताच्या नमुन्यात बदल केल्याप्रकरणी अटक केलेल्या दोघांंना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी सोमवारी दिले. सविस्तर वाचा पुणे : दहीहंडी उत्सवातही लेझर बीममधून निघणाऱ्या घातक प्रकाशझोतांवर बंदी घालण्याचा आदेश असला, तरी शहरातील अनेक मंडळांनी केलेली एकूण तयारी पाहता, या आदेशाची आज, मंगळवारी प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार, की तो फक्त कागदावर राहणार, याबाबत पुणेकरांमध्ये उत्सुकता आहे. अशा झोतांवर पोलीस काय कारवाई करणार, याकडेही लक्ष लागून राहिले आहे. सविस्तर वाचा मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना काल घडली होती. याप्रकरणी आता दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात आज दहीहंडीचा उत्साह आहे. मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या आहे. या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज आहेत. संस्कृती युवा प्रतिष्ठान, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांसारख्या मोठ्या हंड्या उभारण्यात आल्या आहेत. नागपूर : परस्परांच्या प्रेमात पडल्यानंतर तरुण-तरुणीने घरच्यांच्या संमतीने प्रेमविवाह केला. चार वर्षे सुरळीत सुंसार सुरु होता. मात्र, अचानक फेसबुकवरुन एका दोन मुलांची आई असलेल्या महिलेशी सूत जुळले. दोघांनीही आपापल्या संसारावर पाणी सोडून पुण्यात पलायन केले. मात्र, भरोसा सेलने दोघांचाही शोध घेऊन त्यांचे समुपदेशन केले. सविस्तर वाचा मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आज सतेज पाटील या ठिकाणी भेट देणार आहेत. थोड्या वेळात ते मालवणमध्ये दाखल होतील, अशी माहिती आहे. ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. अशाच आज मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.