PUNE

“आमचं हिंदुत्ववादी सरकार ३१ डिसेंबर ला आपापल्या घरी पार्टी…”, भाजपच्या ‘या’ आमदाराने दिला इशारा

भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी नूतन वर्षाच्या आधीच गडकिल्ल्यांवर धुडगूस घालणाऱ्यांना इशारा दिला आहे. हे भाजपचं हिंदुत्ववादी सरकार आहे. ३१ डिसेंबरला आपापल्या घरी पार्टी करायची असा थेट इशारा तरुण- तरुणींना दिला आहे. अमित गोरखे हे पिंपरी- चिंचवड मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. हेही वाचा >>> पुणे : अचानक मोठ्या आवाजाने जाग आली आणि…, जखमी तरुणाचा अंगावर काटा आणणारा अनुभव अमित गोरखे यांनी ३१ डिसेंबरच्या निमित्ताने थेट पार्टी करणाऱ्या तरुण- तरुणींना इशारा दिला आहे. ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्य भूमी आहे. ३१ डिसेंबरला आपापल्या घरी पार्टी करायची, गडकिल्ल्यांवर धुडगूस घालणार असाल तर तुम्हाला शिवप्रेमी धडा शिकवतील. तरुण- तरुणींनी धुडगूस घालू नये अस आवाहन करत इशारा दिला आहे. भाजप चे आमदार अमित गोरखे यांनी हिवाळी अधिवेशनात पिंपरी-चिंचवड शहरातून सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गोरखे यांनी दिलेला हा इशारा कितपत योग्य ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.