ASTROLOGY

१८ ऑगस्ट पंचांग: अचानक धनलाभ ते जोडीदारासाठी शुभवार्ता; कोणत्या राशींसाठी रविवार असणार सुख-समृद्धीचा? वाचा तुमचं राशीभविष्य

18th August Panchang & Marathi Rashi Bhavishya : आज १८ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी रविवारी दुपारी ३ वाजून ०५ मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर पौर्णिमा तिथीचा प्रारंभ होईल. आजच्या दिवशी आयुष्मान योग सकाळी ७ वाजवून ५१ मिनिटांपर्यंत चालू राहील. त्यानंतर सौभाग्य योग सुरु होईल. तर उत्तराषाढा नक्षत्र सकाळी १० वाजून १५ पर्यंत राहील, त्यानंतर श्रावण नक्षत्र दिसेल. आजचा राहू काळ संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजेपर्यंत असेल. तर मेष ते मीन राशींचा रविवार कसा जाईल हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या. मेष:- माहीत नसलेल्या कामात लक्ष घालू नका. ठरवलेले विचार अचानक बदलू नका. वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल. परदेश कंपनी कडून लाभाचे योग. उत्पन्नात वाढ होईल. वृषभ:- हातातील कामाला यश लाभेल. शेजार्‍यांची मदत घेता येईल. धन वृद्धीचे योग जुळून येतील. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. मिथुन:- नवीन कामात हात घालू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ शक्य. मुलांची एखादी कृती त्रस्त करू शकते. कौटुंबिक वातावरण जपावे. मनोबल वाढीस लागेल. कर्क:- काटकसरीपणाचा फायदा होईल. दुसर्‍याच्या स्वभावातील दोष दर्शवू नका. आजचा दिवस लाभदायक. ज्येष्ठ व्यक्तींचे अमूल्य सहकार्य लाभेल. कार्य शक्तीचे कौतुक केले जाईल. सिंह:- इतरांना सल्ला देण्याचे काम उत्तम करू शकाल. नेहमीसारखी आनंदी वृत्ती जागृत ठेवा. तुमच्या ज्ञानाच्या अनुभवाचे कौतुक केले जाईल. तुमच्या बोलण्याचा समोरच्यावर प्रभाव पडू शकेल. सारासार विचार लाभदायक ठरेल. कन्या:- आजूबाजूचे धूर्त लोक ओळखून रहा. लपवाछपवी च्या गोष्टी करू नका. धन संचयात वाढ होण्याची शक्यता. बचतीच्या योजना आखाल. मागे हटू नका. तूळ:- स्वत:च्या मतावर ठाम रहा. गोड बोलून कार्यभाग साधावा. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. कामात सुलभता जाणवेल. प्रलंबित योजना मार्गी लावाल. वृश्चिक:- आग्रहाला बळी पडू नका. मोठे काम करताना सावधानता बाळगावी. तीव्र इच्छा जागृत ठेवावी. वस्तु खरेदी करताना चोखंदळ रहा. अन्यथा नुकसान संभवते. धनू:- विद्यार्थ्यांना उत्तम काळ राहील. संमिश्र घटनांचा दिवस. कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने सोडवा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. क्षुल्लक गोष्टीने खट्टू होऊ नका. मकर:- नवीन कामात आळस करू नका. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. योग्य संधीची वाट पाहावी. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. कामाच्या स्वरुपात काहीसा बदल संभवतो. कुंभ:- मनातील विचार बोलून दाखवा. चुकीच्या विचारणा प्रयत्नपूर्वक दूर सारा. आर्थिक गोष्टींकडे कटाक्षपणे लक्ष द्या. विवाह इच्छुक असलेल्यांना शुभ वार्ता मिळेल. नेतृत्व गुण वाढीस लावा. मीन:- इतरांचे प्रेम संपादन करा. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या संपर्कात याल. मुलांना नवीन संधि लाभू शकते. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.