ASTROLOGY

१४ ऑगस्ट पंचांग: धनलाभाचे संकेत, गुंतवणुकीतून नफा पण ‘या’ राशींनी आरोग्य जपा; इंद्र योग १२ पैकी कोणत्या राशींचं नशीब बदलणार? वाचा तुमचं राशीभविष्य

14th August 2024 Panchang & Rashi Bhavishya: आज १४ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी आहे. नवमी तिथी १० वाजून २४ मिनिटांपर्यंत चालेल आणि त्यानंतर दशमी तिथी सुरु होईल. आज संध्याकाळी ४ वाजून ६ पर्यंत इंद्र योग राहील. आज बुधवारी दुपारी १२ वाजून १३ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र राहील त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र दिसेल. राहू काळ दुपारी १२ वाजता सुरु होणार असून १ वाजून ३० पर्यत असणार आहे. तर आज मेष ते मीनपैकी १२ राशींचा आजचा दिवस कसा असणार आहे जाणून घेऊ या… १४ ऑगस्ट पंचांग व राशीभविष्य : मेष:- घरात उत्साहाचे वातावरण राहील. आवश्यक तेथेच बढाया मारा. भौतिक विकास होईल. एखादा नवीन करार होण्याची शक्यता. आरोग्यात सुधारणा होईल. वृषभ:- कौटुंबिक खर्च वाढेल. घरात मानाची वागणूक मिळेल. कामातील नवीन योजनांवर भर द्यावा. कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल. मनोकामना पूर्णत्वास जाण्याचे योग. मिथुन:- आपले मानसिक आरोग्य स्वस्थ ठेवा. करमणुकीच्या साधनात जास्त वेळ घालवाल. घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा कराल. मानसिक शांतता व समाधान लाभेल. एखादे काम पूर्ण दिवस घेईल. कर्क:- अति धाडसाने कोणताही निर्णय घेऊ नका. आपल्या बोलण्यात स्पष्टता ठेवाल. सृजनात्मक कार्यातील आवड वाढेल. हातातील कामात यश येईल. सहकारी संपूर्ण सहकार्य करतील. सिंह:- समोरच्या व्यक्तीच्या मतांचा आदर करावा. मुलांबरोबर वेळ आनंदात जाईल. दिनक्रम व्यस्त राहील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वरिष्ठ अधिकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल. कन्या:- अनाठायी खर्चाला बळी पडू नका. कामातील नवीन संधी शोधाव्यात. व्यावहारिक सावधानता बाळगावी. वाणी संयमित असावी. प्रेमातील व्यक्तींना नवीन उत्साह लाभेल. तूळ:- सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. जोडीदाराशी अति वाद टाळावा. आजचा दिवस लाभदायक. नवीन प्रकल्प हाती घेऊ शकता. एखादा जुना वाद संपुष्टात येईल. वृश्चिक:- तुमची मते इतरांना मान्य होतील. अति तिखट पदार्थ टाळा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. नोकरदार वर्गाला दिलासादायक बातमी मिळेल. धनू:- गूढ गोष्टींचे वाचन कराल. तुमचा सल्ला लोक ऐकतील. कामात जोखीम पत्करावी लागेल. नेहमीच्या कामात काहीसा बदल करून पाहावा. नवीन संधी हेरता आली पाहिजे. मकर:- अति जड पदार्थ खाऊ नयेत. विनाकारण पैसे खर्च होतील. घरातील कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. कुंभ:- विद्यार्थांच्या इच्छा पूर्ण होतील. जोडीदाराचे मत शांतपणे ऐकावे. संमिश्र घटनांचा दिवस. आहारावर नियंत्रण ठेवावे. कामे उरकण्याची घाई कराल. मीन:- घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. जुने परिचित लोक भेटतील. व्यापारी वर्गाला सुखकारक दिवस. सामाजिक स्तरावर मान वाढेल. संयमाने समोरील समस्येचे निराकरण करू शकाल. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.