ASTROLOGY

Ganesh Chaturthi 2024 : यंदा गणेशोत्सव कधी सुरू होतोय? घरोघरी बाप्पा कधी विराजमान होणार? जाणून घ्या योग्य तारीख, तिथी अन् शुभ मुहूर्त….

Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat Date And Time : हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिन्यातील नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी या सणांनंतर आता अनेकांना वेध लागलेत ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पाचे आगमन होते. या दिवशी प्रत्येक घरात लाडके गणपती बाप्पा विराजमान होतात. मग पुढे दीड, तीन, पाच, सात, ११ ते अगदी २१ दिवस बाप्पा भक्तांसह वास्तव्य करतात. या काळात गणपती बाप्पाची रोज विधिवत पूजा केली जाते. मोदक, लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो. एकूणच महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या भक्तिभावाने, हर्षोल्हासित मनाने गणेशोत्सव साजरा केला जातो. पण, २०२४ मध्ये गणेश चतुर्थी कधी आहे? घरोघरी बाप्पा केव्हा विराजमान होणार? नेमकी तारीख काय, शुभ तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व काय? याविषयी आपण आजच जाणून घेऊया… हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा ही तिथी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०१ वाजता सुरू होत आहे आणि ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५.३७ वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत उदय तिथीच्या मान्यतेनुसार शनिवार म्हणजे ७ सप्टेंबरपासून गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी घरोघरी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा-अर्चा केली जाईल. या दिवसापासून पुढील २१ दिवसांपर्यंत गणेशोत्सव सुरू राहील. पंचागानुसार यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त दोन तास ३१ मिनिटे असणार आहे. गणेश चतुर्थी २०२३ रोजी सकाळी ११ वाजून ०३ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ३४ मिनिटांपर्यंत श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करीत पूजा करू शकता. गणेश चतुर्थीच्या दिवशी चार शुभ योग तयार होत आहेत. गणेश चतुर्थीला सकाळी ब्रह्म योग आहे; जो रात्री ११ वाजून १७ मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर इंद्र योग तयार होईल. या दोन योगांव्यतिरिक्त रवि योग सकाळी ०६ वाजून ०२ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर सर्वार्थ सिद्धी योग दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत आहे; जो दुसऱ्या दिवशी ८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून ०३ मिनिटांपर्यंत आहे. मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणेश चतुर्थीची सांगता होईल. १० दिवस प्राणप्रतिष्ठा झालेल्या गणेशमूर्तीचे या दिवशी विसर्जन केले जाईल आणि गणपती बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी बाप्पाने लवकर यावे यासाठी प्रार्थना केली जाईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाचा जन्म झाला. या दिवशी लोक उपवास करतात आणि गणपतीची पूजा करतात. श्री गणेशाच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात आणि दुःखे दूर होतात, असे मानले जाते. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.