ASTROLOGY

कृष्ण जन्माष्टमी, २६ ऑगस्ट पंचांग: कृष्णाच्या कृपेने ‘या’ ५ राशींचा दिवस शुभ-फलदायी ठरेल; नात्यात वाढेल प्रेम तर नोकरी, व्यवसायात मिळेल यश; वाचा तुमचं भविष्य

26th August Panchang & Marathi Rashi Bhavishya : आज २६ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी म्हणजेच कृष्णाष्टमी आहे. अष्टमी तिथी पहाटे ३ वाजून ३९ मिनिटांपासून सुरु होईल ते दुसऱ्या दिवशी (२७ ऑगस्ट २०४) मध्यरात्री २ वाजून १९ मिनिटांपर्यंत असेल. तर आजच्या दिवशी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांपासून सर्वार्थ सिद्धी योग राहील. तर कृतिका नक्षत्र दुपारी ३ वाजून ५५ पर्यंत दिसेल. आजचा राहू काळ पहाटे ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. कृष्ण जन्माष्टमीला श्री विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळेच श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो.याशिवाय श्रीकृष्ण जन्माष्टमीबरोबर आज चौथा श्रावणी सोमवार सुद्धा असणार आहे. तर आजचा शुभ दिवस मेष ते मीन राशींचा कसा जाईल? कोणावर असेल श्री कृष्ण व शंकराची कृपा हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या… मेष:- शांत राहून कामे करा. संमिश्र घटना घडू शकतात. काही बाबतीत लाभ मिळू शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे. अधिकार्‍यांशी मतभेद संभवतात. वृषभ:- कुटुंबातील लोकांसोबत वेळ चांगला जाईल. लाभाच्या संधी उपलब्ध होतील. अधिक परिश्रम घेण्याची गरज भासेल. सरकारी नोकरदार वर्गाने शांततेचे पालन करावे. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. मिथुन:- संभ्रमात अडकून राहू नका. विनाकारण खर्च करू नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. मित्रांशी सुसंवाद साधता येईल. जोडीदाराबरोबर मतभेद टाळावेत. कर्क:- तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. जुनी येणी वसूल होतील. हातातील कामे पूर्ण करण्यात दिवस जाईल. नातेवाईकांची गाठ पडेल. दिवस शुभ फलदायी ठरेल. सिंह:- व्यावसायिक ठिकाणी अधिकार प्राप्त होतील. आपले म्हणणे लोकांना पटेल. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवा. अनामिक भीती लागून राहील. कठोर मेहनत घ्यावी लागेल. कन्या: – बोलण्यातून लोकांना आपलेसे करा. हाती घेतलेल्या कामात यश येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कामाचे योग्य नियोजन करावे. अति श्रमाचा थकवा जाणवेल. तूळ:- प्रकृतीची काळजी घ्या. एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रवास काळजीपूर्वक करावा. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. वृश्चिक:- प्रिय व्यक्तीचे मत टाळू नका. हातातील काम पूर्णत्वास न गेल्याने चिडचिड होईल. अधिकार्‍यांशी मतभेद होण्याची शक्यता. सरकारी कामे अडकण्याची शक्यता. निराशाजनक विचार टाळा. धनू:- घरगुती गोष्टींसाठी पैसे खर्च होतील. कोणत्याही गोष्टीची अति घाई करू नका. कामातून समाधान लाभेल. जुनी येणी प्राप्त होतील. घरगुती प्रश्न लक्षात घ्या. मकर:- भागीदारीच्या व्यवसायात चोख रहा. सर्व अटी तपासून पहा. समस्येतून मार्ग काढाल. वैवाहिक जीवन उत्तम राहील. पैज जिंकता येईल. कुंभ:- मानसिक स्थिती भक्कम करा. अनावश्यक खर्चात वाढ होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन सुलभ असेल. महिला वर्गासाठी विशेष दिवस. मीन:- बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. मुलांबरोबर दिवस मजेत घालवाल. एखाद्या स्पर्धेत यश मिळवाल. आरोग्याची काळजी घ्यावी. पथ्यपाणी वेळेवर सांभाळा. ज्योतिषी विद्याधर करंदीकर None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.