ASTROLOGY

आता नुसता पैसा; कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गुरू, चंद्र, शनी चमकवणार ‘या’ तीन राशींचे भाग्य

Krishna Janmashtami 2024: हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्वपूर्ण मानले जाते. कारण, या दिवशी श्री विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळेच श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो. यंदा २६ ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाईल. या दिवशी अनेक शुभ योगांची निर्मिती होणार अनेक वर्षांनंतर या दिवशी ग्रह-नक्षत्रांचा दुर्लभ संयोग निर्माण होत आहे. या दिवशी अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र, हर्षण योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असा शुभ संयोग निर्माण होणार आहे. तसेच जयंती योग, शश राजयोग, शुक्रादित्य राजयोग, गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे हा दिवशी काही राशींसाठी खूप शुभ असेल. मेष मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुभ योग, ग्रहांची चाल खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल, समस्या दूर होण्यास मदत होईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. दूरचे प्रवास घडतील. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. आरोग्य समस्या दूर होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील. फक्त या काळात आरोग्याची काळजी घ्या. सिंह सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शुभ योग खूप भाग्यकारक असेल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. नव्या नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. मानसन्मानात वाढ होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. समाधानी आणि सकारात्मक असाल. कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल, त्यामुळे आयुष्यात तणाव दूर होईल. लहान-मोठ्या अडचणींवर मात कराल. प्रेमसंबंध मजबूत होतील. हेही वाचा: पुढचे २१६ दिवस नुसता पैसा; शनीच्या कृपेने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय कन्या कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हे शुभ योग खूप लाभदायी सिद्ध होतील. या काळात मोठा धनलाभ होईल. व्यवसायात तुमची प्रगती होण्याची शक्यता असून मोठा नफा मिळू शकतो. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊन समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल आणि सुख-शांतीचे वातावरण राहिल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी मिळतील. (टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.