KOLHAPUR

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे चार टोल नाक्यांवर आंदोलन सुरू; टोल आकारणीस विरोध

कोल्हापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे रेंगाळलेले विस्तारीकरण, रस्त्यावर पडलेले खड्डे, यांमुळे वाहनधारकांना होणारा त्रास या प्रश्र्नी शनिवारी कोल्हापूर जवळील किनी टोल नाका येथे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन पुणे ते कोल्हापूर या मार्गावर चार ठिकाणच्या टोल नाक्यावर केले जात आहे. पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रुंदीकणाचे काम सुरु आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्यामुळे प्रवासाला दीडपट वेळ लागत आहे. खराब रस्ते असूनही टोल वसूल केला जात आहे. रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ व्हावा, या मागणीसाठी महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसने आज आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे. हेही वाचा : जीवदान मिळालेली ‘दुवा’च ठरली योजनेची सदिच्छा दूत; मुख्यमंत्री सहायता निधीच्या मदतीचा संस्मरणीय प्रवास कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजता राष्ट्रीय महामार्गावरील किणी येथील टोलनाक्यावर जमले. पुणे पासून ते कागल -कोगनोळी या महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची कमालाची दुरवस्था झाली आहे. वाहनधारकांना त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे टोल आकारणीचा हक्क गमावला आहे, अशी भूमिका घेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी टोल नाक्यांवर टोल आकारणीस विरोध केला. महामार्गावर जमलेली सर्व वाहने टोलची रक्कम न घेता सोडावीत, असा आग्रह त्यांनी धरला. हेही वाचा : शिरोळमध्ये ट्रॅक्टर नदीत उलटून एकाचा मृत्यू , दोघे बेपत्ता पश्चिम महाराष्ट्रात टोल विरोधी आंदोलन किनी, आणेवाडी, तासवडे , खेड शिवापुर या चार टोल नाक्यांवर सुरू झाले असून त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार संग्राम थोपटे , संजय जगताप, विक्रम सावंत यांच्यासह काँग्रेसचे नेते सहभागी झाले आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.