KOLHAPUR

Keshavrao Bhosale Theater Fire: कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग

Keshavrao Bhosale Theater Kolhapur Massive Fire येथील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला रात्री दहाच्या दरम्यान आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन पथकाचे जवान कार्यरत झाले होते. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह हे वारसा हक्क स्थळातील आहे. अलीकडेच वारसा स्थळाला अनुसरून नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले होते. अशा या नाट्यगृहाला रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान आग लागली. कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली असुन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत. सर्व नाट्यगृहातून आगीचे लोट बाहेर पडत आहे. सर्व नाट्यगृहाला चारही बाजूने आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे…!? #कोल्हापूर #केशवराव_भोसले_नाट्यगृह pic.twitter.com/6zf968obUV केशवराव भोसले नाट्यगृहाला लागून असलेले ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदान , देवल क्लब संगीत मंडळ आणि यादरम्यान असलेली खाऊ गल्ली यामुळे येथे रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. आग लागल्यानंतर तातडीने महापालिकेचे अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. त्यांच्या जवानांनी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले. मात्र आग मोठी असल्याने ती विजवण्यासाठी अडचणी येत होत्या. सध्या मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेले नाही. परंतु केशवराव भोसले नाट्यगृहाचा काही भाग कोसळला असून छत कोसळले आहे. हेही वाचा : Keshavrao Bhosale Theater Fire: केशवराव भोसले नाट्यगृहाची आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न; वरिष्ठांची घटनास्थळी धाव केशवराव भोसले नाट्यगृह ऊर्फ पॅलेस थिएटरला लागलेल्या आगीचे पडसाद अजूनही गंभीर आहेत. त्यावरून आता या घटनेबाबत चर्चेच्या ज्वाळा उठू लागल्या आहेत. ही आग प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लागली असल्याचा आरोप करून आगीची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. त्यामध्ये अनावश्यक बदल करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीने केली आहे. त्यांनी पत्रकात नमूद केले आहे की, १९१२ साली छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या पॅलेस थिएटर तथा केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग कुस्ती मैदान साकारले. आज नाट्यगृहाला लागलेल्या आगीत संपूर्ण लाकडी साहित्याने उभारलेले व्यासपीठ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शॉर्ट सर्किटमुळे जळून नष्ट झाले आहे. शाहू महाराजांच्या वास्तूचे नूतनीकरण करण्यासाठी आणलेला कोट्यावधी रुपयांचा निधी वाया गेला आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनांना टक्केवारीतून लचके तोडण्याची लागलेली सवय आणि निष्काळजीपणाची कामे याचे हे गंभीर दुष्परिणाम आहेत. हेही वाचा : कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्य फळफळले! कागलला आयुर्वेदिक, उत्तुरला योग, निसर्गोपचार महाविद्यालयास मंजुरी गुंतागुंतीचे आणि अनावश्यक ठिकाणी केलेले वायरिंग, त्याच्यात देखभाल दुरुस्तीकडे केलेले दुर्लक्ष यामुळे आग प्रथम मागील बाजूस म्हणजे कुस्ती मैदानाच्या मंचाजवळ असणाऱ्या वीज नियंत्रण असणाऱ्या खोलीमध्ये लागली. तेथे ठिणग्या पडल्या. बाजूला असणाऱ्या नाट्यगृहातील लाकडी मंचाला आग लागली. त्या आगीमुळे वातानुकूलित यंत्रणेचा स्फोट झाला. पाठोपाठ आग मुख्य नाट्यगृहामध्ये पसरली. आत मध्ये पूर्ण लाकडी गॅलरी, खुर्च्यांचे कुशन, सिलिंग, लाकडी साहित्य लगेच पेटले. शाहू महाराजांचे वैभव पाहता पाहता संपुष्टात आले. या आगीची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, नाट्यगृहामध्ये अनावश्यक बदल करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीने केली आहे. या ठिकाणी चाललेल्या चुकीच्या, बेकायदेशीर कामाबाबत आम्ही आवाज उठवत होतो. पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. त्याची किंमत आज अशाप्रकारे मोजावी लागते आहे , असे दुःखही त्यांनी व्यक्त केले आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.