KOLHAPUR

कुरुंदवाड मुख्याधिकाऱ्यांविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना पाठवले सक्तीच्या रजेवर

कोल्हापूर : कुरुंदवाडचे मुख्याधिकारी यांच्या विरोधात एका ध्वनिचित्रफितीवरून शनिवारी नगरपालिकेसमोर सर्वपक्षीयांनी आंदोलन केले. यामुळे तणाव निर्माण झाला होता. या वादग्रस्त ध्वनीचित्रफितीचा परिणाम म्हणून मुख्याधिकारी आशिष चौहान यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय तातडीने रात्री जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला आहे. त्यांच्या जागी जयसिंगपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी टीना गवळी त्यांच्याकडे प्रभारी पदभार सोपवण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. कुरुंदवाड नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान व कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांची वादग्रस्त ध्वनिचित्रफीत अग्रेषित झाली. त्यामध्ये त्यांनी स्थानिक नागरिकांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. त्यावर नागरिक बचाव कृती समितीचे कार्यकर्ते पालिकेसमोर जमले. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. हेही वाचा >>> जरांगे पाटील यांचा मराठवाड्यात जाऊन समाचार घेणार, नारायण राणेंचा इशारा आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे, शहराध्यक्ष बाबासाहेब सावगावे, माजी शहराध्यक्ष राजू आवळे, यड्रावकर गटाचे माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रा. सुनील चव्हाण, बबलू पवार, बचाव कृती समितीचे अध्यक्ष सुनील कुरुंदवाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी आलासे, तालुकाप्रमुख बबलू पवार, आयुब पट्टेकरी, रघु नाईक आदी सहभागी झाले होते. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.