KOLHAPUR

कोल्हापुरात मिरवणुकीत ध्वनी नियमांचे उल्लंघन

कोल्हापूर : रात्री बाराच्या ठोक्याला आवाजाच्या भिंती बंद केल्यावरून पाठ थोपटून घेण्याचा प्रकार झाला असला तरी त्याआधी कोल्हापुरातील मिरवणूक मार्गावर ध्वनी नियमांचे उल्लंघन झाल्याचे शिवाजी विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. यंदा विधानसभा निवडणुका असल्याने गणेशोत्सव वाजत गाजतच साजरा केला गेला. गणेश आगमनाच्या वेळी वाद्यांच्या भिंती उभारल्या होत्या. विसर्जन मिरवणुकीवेळी त्या पुन्हा होत्याच. मात्र त्या मोठ्या आवाजात वाजत असताना त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिवसभर दिसून आले होते. अनंत चतुर्दशीला शहरातील २२ ठिकाणी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाने ध्वनिमापन केले. त्यामध्ये सर्वच ठिकाणी मोजलेला आवाज हा ध्वनिप्रदूषण नियम २००० च्या मानांकनापेक्षा अधिक होता. हेही वाचा – आमदार प्रकाश आवाडे यांना अण्णासाहेब गोडबोले पुरस्कार जाहीर हेही वाचा – राज्यात तिसऱ्या आघाडीचे भवितव्य कठीण; सतेज पाटील औद्योगिक, व्यावसायिक, निवासी व शांत अशा सर्व ठिकाणी आवाजाचे उल्लंघन गतवर्षीपेक्षाही अधिकच असल्याचे दिसून आले. शिवाजी विद्यापीठासारख्या शांत क्षेत्रात गतवर्षी ४५ डेसिबल असणारा आवाज यंदा ७१ डेसिबलपर्यंत वाढला होता. राजारामपुरीसारख्या निवासी भागात ५२ डेसिबल असणारा आवाज यावेळी ९५.३ डेसिबल इतका प्रचंड वाढला होता. गंगावेस या व्यापारी भागात ७७.६ डेसिबल राहिलेला आवाज यावेळी ९४.३ डेसिबल इतका असा दणदणाट सुरू होता. तर उद्यमनगर सारख्या औद्योगिक भागात ५८.४५ डेसिबल असणारा आवाज कालच्या रात्री ७८.४ डेसिबलपर्यंत वाढला होता. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.