NAVIMUMBAI

नवी मुंबई विमानतळावर वायू दलाच्या लढाऊ विमानाची चाचणी लवकरच

नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवर वायुदलाच्या लढाऊ विमान उड्डाण चाचणीसाठी जोरदार तयारी विमानतळावर सूरू आहे. ११ आॅक्टोबर म्हणजे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी प्रत्यक्ष पाहणीसाठी निवडक मान्यवर आणि पत्रकारांना बसण्यासाठी विशेष मंडपाची सोय करण्याचे काम सुरु आहे. सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष विजय सिंघल यांच्याकडे सिडकोची सूत्रे हाती असताना विमानतळाचे काम प्रगतीपथावर आहे. सिडको मंडळाला तीन महत्वाचे प्रकल्प आचारसंहितेपूर्वी मार्गी लावायचे होते. या तीन प्रकल्पांमध्ये २६ हजार महा गृहनिर्माण प्रकल्पाची सोडत, खालापूर येथील इरशाळवाडी येथे आदिवासी बांधवांना घरांचे वाटप आणि सर्वात महत्वाचा प्रकल्प हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमानांच्या चाचण्या हे तीन प्रक्लप आहेत. धावपट्टीवरील चाचणीमध्ये हवाई दलाचे सूखोई हे विमान धावपट्टीपासून काही अंतरावर उडणार आहे तसेच अन्य दूस-या विमानाचे प्रत्यक्ष विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरले जाणार आहे. हा सोहळा पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये करण्याचे नियोजन होते. यासाठी सिडकोने पंतप्रधान कार्यालयाकडे वेळ सुद्धा मागीतली होती. मात्र ही वेळ न मिळाल्याने महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा कऱण्यासाठीचे नियोजन सिडकोत सूरु आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.