NAVIMUMBAI

उरणमध्ये शारदोत्सवात आदिशक्तीचा जागर

उरण : शारदोत्सवाला सुरुवात झाली असून तालुक्यातील आदिशक्तीचा जागर सुरू झाला आहे. यासाठी अनेक गावातील देवीची मंदिरे सजली आहेत. तर उरणमध्ये सार्वजनिक ९९ मूर्ती, ११ घट आणि दोन प्रतिमांची स्थापना करण्यात येणार आहे. या नवरात्रोत्सवाची विशेषत: तरुणाईला मोठी उत्सुकता लागून राहिलेली असते. तालुक्यातील काही ठरावीक नवरात्रोत्सव मंडळ सातत्याने रास-गरबा नृत्याबरोबरच विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे ही वाचा… उरणच्या बाह्यवळण मार्गाला भूसंपादनाचा अडथळा यामध्ये उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६५, न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०, तर मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे कार्यरत आहेत. या ९९ सार्वजनिक नवरात्र मंडळांनी ९९ मूर्तींची स्थापना केली आहे. शहरातील गुरुकुल अॅकॅडमी, जवाहरलाल नेहरू बंदर कामगार वसाहतीतील ऐश्वर्या कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचा ऐश्वर्या रास गरबा, चिरनेर येथील शिवसेनाप्रणित नवरात्रोत्सव मंडळ, करंजा येथील नवापाडा मित्र मंडळाचा फक्त महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा ड्रेसकोडच्या तालावर थिरकणारा गरबा आणि परिसरात इतर ठिकाणी सुरू झालेल्या रास-गरब्यांना सुरुवात झाली आहे. तर उरण परिसरातील आई जगदंबेची अनेक मंदिरे आहेत. हे ही वाचा… शिंदे गटाच्या शहरप्रमुखाचा पोलिसांसमोर थयथयाट नवरात्रोत्सवाची जागा, कमानी, दिव्यांचे खांब काढण्यावरून वादंग करंजा येथील द्रोणागिरी देवी, उरण शहरातील उरणावती देवी, डोंगरीची अंबादेवी, नवीन शेव्यामधील शांतेश्वरी देवी, जसखार येथील रत्नेश्वरी देवी, फुंडे येथील घुरबादेवी, चिरनेरच्या इंद्रायणीच्या डोंगरमाथ्यावर विराजमान असलेली आणि मोरा येथील एकवीरा देवी, पीरवाडी येथील मागीणदेवी, उरण शहरातील शीतलादेवी, न्हावा येथील गावदेवी, गव्हाण येथील शांतादेवी अशा अनेक देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवादरम्यान देवीचा जागर केला जातो. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.