NAVIMUMBAI

नवी मुंबई पोलीस दलाच्या नावाचे एक्सवर बनावट खाते

नवी मुंबई : नवी मुंबईत मागील दोन वर्षात ऑनलाईन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून या चोरट्यांनी उच्चशिक्षित आणि धनिकांना आपले लक्ष्य केले आहे. कोट्यावधी रुपयांची चोरी ऑनलाईन चोरीचे सत्र सूरु असून दिवसाला एकतरी चोरीच्या घटना नोंद केल्या जात आहेत. मात्र या चो-या रोखण्यासाठी नवी मुंबई पोलीस असमर्थ ठरले असून गुरुवारी नवी मुंबई पोलीसांनी स्वताच नवी मुंबई पोलीसांच्या नावाने बनावट एक्स खाते सूरु केलेल्या व्यक्ती विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. त्यामुळे ऑनलाईन चोर हे पोलीसांवर शिरजोर झाल्याचे चित्र आहे. नवी मुंबई पोलीस दलाचे परिवर्तन काळानुरुप आधुनिक पोलीस दलात करण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी कंबर कसली आहे. यासाठी आयुक्त भारंबे यांनी काही महाविद्यालयांमधील सायबर सूरक्षा विषयाच्या प्राध्यापकांच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचे शिकवणीवर्ग सूरु करण्याचा प्रयोग केला. प्रत्येक पोलीस ठाण्यात किमान दोन तरी अधिकारी आणि चार कर्मचा-यांना तरी सायबर सूरक्षेचे ज्ञान असणे गरजेचे असल्याचा हा प्रयोग नवी मुंबईत पहिल्यांदा करण्यात आला. नवी मुंबई पोलीस दलाला आयुक्त भारंबे यांच्याकाळात पहिल्यांदा सायबर सेल मध्यवर्ती पोलीस ठाणे सूरु झाले. वर्षभरात या सायबर पोलीस ठाण्यात सुद्धा ऑनलाईन चोरी व अपहाराचे २२१ गुन्हे दाखल आहेत. मोठमोठ्या उद्योगपती किंवा नामांकित व्यक्तीच्या नावाने ही चोरी भामट्यांकडून केली जाते. गुरुवारी सायबर सूरक्षा पोलीस ठाण्यात पोलीसांनी दिलेल्या फीर्यादीमध्ये मागील चार वर्षांपासून एका अनोळखी भामट्याने एक्स या अॅपवर नवी मुंबई पोलीस दलाचे आणि पोलीस आयुक्तांच्या नावाचे बनावट खाते सूरु केल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले. तसेच या भामट्याने इन्स्टाग्रामवर सुद्धा नवी मुंबई पोलीस दलाच्या नावाने बनावट खाते सूरु केले आहे. हे ही वाचा… उरणमध्ये शारदोत्सवात आदिशक्तीचा जागर पोलीसांच्या सायबर सूरक्षा विभाग नियमितपणे समाजमाध्यमांवरील विविध संकेतस्थळ आणि विविध समाजमाध्यमांच्या अॅपवर पोलीसांच्या नावाने नागरिकांना फसविण्यासाठी अशी बनावट खाती सूरु आहे का याचा मागोवा घेत असतात. याच मागोवा घेत असताना पोलीसांच्या सायबर विभागाला संबंधित खाती आढळल्याने पोलीसांनी स्वताहून या प्रकरणी गुन्हा नोंदविला. या खात्यावर कोणत्याही नागरिकाची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीसांकडे कोणी केली नव्हती अशी माहिती सायबर सूरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गजानन कदम यांनी दिली. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.