लोकसत्ता प्रतिनिधी पनवेल : भारतीय शेतकरी कामगार पक्षाने पनवेल, उरणसह नवी मुंबईतील विविध विधानसभा मतदारसंघाच्या मतदारसंख्येत ८५,१२९ मतदारांची दूबार नावे तातडीने रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील यांनी याबाबत पहिल्यांदा पनवेलच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी केली. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती दिली. माजी आ. पाटील यांनी पनवेल विधानसभा १८८ मतदार संघात नोंद असलेले आणि आजुबाजुला हाकेच्या अंतरावर असलेल्या इतर उरण, नवी मुंबईतील विधानसभा मतदारसंघात ही नोंद असलेल्या मतदार तसेच संशयास्पद पत्ते नसलेले अणि पनवेल मतदारसंघातील मतदार यादीत दुबार नावे असलेली रद्द करावी अशी मागणी १० सप्टेंबरला पनवेलच्या उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांकडे केली होती. आणखी वाचा- नवी मुंबईतील दौऱ्यात अमित शहांची ‘संघ’वारी राज्यातील सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या विधानसभा क्षेत्रात पनवेल विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. सध्या या मतदारसंघात ६ लाख ४२ हजार ५७ मतदार आहेत. विविध औद्योगिक वसाहतींसह माथाडी कामगार पनवेलमध्ये राहतात. त्यामुळे परराज्यातील कामगार वर्ग येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. सध्या पनवेलमधील दूबार नावे असलेल्यांची मतदारांची संख्या २५ हजार ७७२ एवढी असून पत्ते व दोषयुक्त असलेले ५८८ नावे आहेत असे असल्याने माजी आ. पाटील यांनी संशय व्यक्त केला आहे. आणखी वाचा- अमित शहांचा दौरा गणेश नाईकांसाठी फलदायी ? उरण विधानसभा मतदार संघात देखील २७ हजार २७५ मतदार तसेच बेलापूर विधानसभा मतदार संघात १५ हजार ३९८ मतदार आणि ऐरोली विधानसभा मतदार संघात १६ हजार ९६ मतदारांची नोंद असल्याचे निदर्शनास आल्याने माजी आ. पाटील यांनी पनवेलचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना निवेदनाव्दारे प्रत्यक्ष दुबार व दोषयुक्त मतदारांच्या नावांची यादीसह नावे कमी करण्यासाठी लेखी तक्रार दाखल केली. परंतू अधिकारी वर्गाकडून दिरंगाई होण्याची शक्यता असल्याने व मतदार संघात बोगस मतदान होऊ नये म्हणुन न्याय मिळणेसाठी उच्च न्यायालयात (Wpst no28080/2024) याचिका देखील दाखल केली आहे. None
Popular Tags:
Share This Post:
महायुतीतील संघर्षात मविआला संधी? भाजपसमोर पक्षांतर्गत वाद; शिंदे गटाच्या नाराजीचे आव्हान
October 16, 2024What’s New
Spotlight
बँकेच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून पतीच्या जमिनीवर परस्पर कर्ज
- by Sarkai Info
- October 15, 2024
Today’s Hot
-
- October 9, 2024
-
- October 9, 2024
-
- October 9, 2024
नवी मुंबई विमानतळावर वायू दलाच्या लढाऊ विमानाची चाचणी लवकरच
- By Sarkai Info
- October 8, 2024
Featured News
कळंबोली सर्कलची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ७७० कोटींचे उड्डाणपूल
- By Sarkai Info
- October 8, 2024
नवी मुंबई : बांधकाम नियमावलीचे कागदी घोडे
- By Sarkai Info
- October 8, 2024
Latest From This Week
नवी मुंबई पोलीस दलाच्या नावाचे एक्सवर बनावट खाते
NAVIMUMBAI
- by Sarkai Info
- October 4, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.