Akshay Kelkar : मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार गेल्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकले आहेत. तर, काही कलाकारांनी सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिल्याचं पाहायला मिळालं. नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता तसेच ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकरने त्याच्या १० वर्षांच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला आहे. त्याची ‘रमा’ नेमकी आहे तरी कोण? जाणून घेऊयात… ‘बिग बॉस’च्या घरात अक्षय केळकरने ( Akshay Kelkar ) अनेक वर्षांपासून तो रिलेशनशिपमध्ये असल्याबद्दल खुलासा केला होता. मात्र, घरात तो त्याच्या गर्लफ्रेंडचा उल्लेख ‘रमा’ असा करायचा. आयुष्याची गाडी संपूर्णत: रुळावर आल्याशिवाय घरी सांगायचं नाही असं अभिनेत्याने ठरवलं होतं आणि यामुळे अक्षय केळकरने तब्बल १० वर्षे त्याचं रिलेशनशिप गुपित ठेवलं होतं. अखेर आता सगळ्या गोष्टी मार्गी लागल्यावर त्याने ‘रमा’ नेमकी कोण आहे याची पोस्ट शेअर करत माहिती दिली. अक्षयच्या आयुष्यातली रमा म्हणजे साधना काकटकर. ही एक लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते. मेतरा, आनंदाचे गाव, नाखवा यांसह अक्षयच्या अनेक गाण्यांना साधनाने तिचा आवाज दिला आहे. हेही वाचा : Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो अक्षयप्रमाणे साधनाने सुद्धा दोघांचा एकत्र फोटो शेअर करत पहिली पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. साधना लिहिते, “त्याने वचन दिलेलं, तो थांबला…त्याने ते वचन निभावलं! आजच्या जगात तू स्वत: Old Classic राहिलास याबद्दल तुझे आभार… आपली लव्हस्टोरी इतकी सुंदर बनवल्यावर तुझे आभार… आता आपलं नातं जगजाहीर झालंय! आपण या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली होती पण, खरंच हा दिवस खूपच सुंदर आहे. १० वर्षे झाल्यानंतर एवढंच कौतुक करू शकते. अक्षय केळकर गेलास रे आता कामातून…” अक्षय केळकर ( Akshay Kelkar ) व साधना यांच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. सौरभ चौघुले, समृद्धी केळकर, प्रथमेश परबची पत्नी क्षितीजा, रसिका वेंगुर्लेकर, गायत्री दातार, शरद केळकर, अभिजीत श्वेतचंद्र, मेघना एरंडे अशा सगळ्या कलाकारांनी कमेंट्समध्ये या दोघांचं भरभरून कौतुक केलं आहे. हेही वाचा : Allu Arujn : अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढल्या! चौकशीसाठी पुन्हा समन्स, पोलीस उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत A post shared by Sadhana Kakatkar (@sadhana_kakatkar) दरम्यान, अक्षयच्या ( Akshay Kelkar ) कामाबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच तो ‘कलर्स मराठी’च्या ‘अबीर गुलाल’ मालिकेत झळकला होता. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. याशिवाय अक्षय केळकर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता देखील आहे. None
Popular Tags:
Share This Post:
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आला! एसटी स्टँडवर जाहीर घोषणा करत अर्जुनने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला, “मिसेस सायली…”
December 24, 2024Video: ‘बिग बॉस मराठी’ विजेता लवकरच चढणार बोहल्यावर, आनंदाची बातमी देत सांगितली लव्हस्टोरी
December 24, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 24, 2024
-
- December 24, 2024
-
- December 23, 2024
Featured News
Latest From This Week
४ वर्षांनी हाथीराम चौधरी पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘पाताल लोक २’ कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या
MANORANJAN
- by Sarkai Info
- December 23, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.