दिलजीत दोसांझने आपल्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं आहे, असा दावा एपी ढिल्लनने केला होता. त्यानंतर दिलजीतने त्यावर प्रतिक्रिया देत त्याला कधीच ब्लॉक केलं नाही, असं म्हटलं. अशातच आता आणखी एका गायकाने म्हटलंय की त्याला विराट कोहलीने ब्लॉक केला आहे. या गायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विराटने ब्लॉक केल्याचा दावा प्रसिद्ध गायक राहुल वैद्यने केला आहे. आज त्याने पापाराझींशी बोलताना म्हटलं की त्याला विराटने इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं आहे. “माहीत नाही का, पण मला विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं आहे. मला आजपर्यंत समजलं नाही की त्याने मला ब्लॉक का केलं. तो भारतातील सर्वात्तम फलंदाजांपैकी एक आहे. पण माहीत नाही मला का ब्लॉक केलं. कदाचित काहीतरी घडलं असेल”, असं राहुल वैद्य म्हणाला. हेही वाचा – दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहने घेतली उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “आम्ही केलेल्या चुकांची…” A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan) फिल्मीज्ञान या पापाराझी अकाउंटवरून राहुलचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काहींनी विराट कोहली सध्या इन्स्टाग्रामवर फार पोस्ट करत नाही, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस असं म्हटलं आहे. तर काहींनी विराट कोहली तुला ओळखत नसेल, अशा कमेंट्स केल्या आहेत. हेही वाचा – Video: हल्ला झाल्यानंतर पत्नी, मुलांना घेऊन अल्लू अर्जुनने सोडलं घर; त्याचे वडील म्हणाले, “आज आमच्या घरी जे घडलं ते…” एपी ढिल्लनने दिलजीत दोसांझने ब्लॉक केल्याचा आरोप केल्यानंतर सोशल मीडियावर या दोघांबद्दल जोरदार चर्चा आहे. दिलजीतने एक फोटो पोस्ट करत आपण कधीच एपी ढिल्लनला ब्लॉक केलं नाही; असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे एपी ढिल्लनने काही स्क्रीनशॉट शेअर केले होते. या दोघांच्या वादावर रॅपर बादशाहने अप्रत्यक्ष प्रतिक्रिया दिली. त्याने व हनी सिंगने जी चूक केली ती या दोघांनीही करू नये, अशी विनंती त्याने पोस्टमध्ये केली. हेही वाचा – खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो दिलजीत व एपी ढिल्लनच्या वादावर पडदा पडलेला दिसत असताना आता राहुल वैद्यने विराट कोहलीने ब्लॉक केल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता विराटने राहुलला नेमकं का ब्लॉक केलं, याची चर्चा सुरू आहे. None
Popular Tags:
Share This Post:
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आला! एसटी स्टँडवर जाहीर घोषणा करत अर्जुनने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला, “मिसेस सायली…”
December 24, 2024Video: ‘बिग बॉस मराठी’ विजेता लवकरच चढणार बोहल्यावर, आनंदाची बातमी देत सांगितली लव्हस्टोरी
December 24, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 24, 2024
-
- December 24, 2024
-
- December 23, 2024
Featured News
Latest From This Week
४ वर्षांनी हाथीराम चौधरी पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘पाताल लोक २’ कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या
MANORANJAN
- by Sarkai Info
- December 23, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.