MANORANJAN

गौतमी पाटीलची आता छोट्या पडद्यावर जबरदस्त एन्ट्री, ‘या’ लोकप्रिय कार्यक्रमात पाहायला मिळणार

आपल्या दिलखेच अदा आणि नृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणी गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. गौतमीने आपल्या नृत्य कौशल्याने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. तिचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला गर्दी मोठ्या प्रमाणात होतं असते. सध्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे प्रमाण आणि तिची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे. तसंच गौतमी अभिनय क्षेत्राकडे वळली असून मराठी सिनेसृष्टीत सक्रिय झाली आहे. आता गौतमी छोट्या पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच एका लोकप्रिय कार्यक्रमात गौतमी पाटील पाहायला मिळणार आहे. हो, हे खरं आहे. गौतमी पाटील महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी ‘स्टार प्रवाह’वर झळकणार आहे. ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा ३’मध्ये गौतमी पाटील दिसणार आहे. या कार्यक्रमात गौतमीची ठसकेबाज लावणी पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हेही वाचा – Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीनंतर आणखी दोन सदस्य घराबाहेर; कशिश कपूर ढसाढसा रडत म्हणाली, “इथे प्रत्येकजण साप…” ‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर गौतमी पाटीलचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. “नृत्यांगना गौतमी पाटील थिरकणार धिंगाणाच्या मंचावर…”, असं कॅप्शन लिहित ‘आता होऊ दे धिंगाणा ३’चा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये गौतमीची जबरदस्त लावणी पाहायला मिळत आहे. गौतमीच्या अदा, लावणी पाहून विशाल निकम शिट्टी वाजवताना दिसत आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या येत्या भागात हे पाहायला मिळणार आहे. हेही वाचा – Video: अखेर ‘बिग बॉस मराठी ४’ विजेता अक्षय केळकरची गर्लफ्रेंड ‘रमा’ आली समोर, अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का A post shared by Star Pravah (@star_pravah) हेही वाचा – वरुण धवनच्या घरात घुसली होती चाहती, प्रसंग सांगत अभिनेता म्हणाला, “एका पॉवरफुल व्यक्तीची ती पत्नी होती अन्…” दरम्यान, गौतमी पाटीलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘मूषक आख्यान’ चित्रपटात गौतमी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर झळकली. त्याआधी ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपटातील एका गाण्यात गौतमीचा जबरदस्त डान्स पाहायला मिळाला. या चित्रपटातील ‘लिंबू फिरवलं’ या गाण्यात गौतमी अमेय वाघबरोबर थिरकली होती. त्यानंतर गौतमी पाटील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, सई ताम्हणकर, शिव ठाकरेबरोबर झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. गौतमी पाटीलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये गौतमीसह अलका कुबल, सई ताम्हणकर, शिव ठाकरे पाहायला मिळाले होते. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.