MANORANJAN

ऐश्वर्या नारकर यांची ऑनस्क्रीन लेक अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला सोहळा, फोटो आले समोर

मराठी सिनेविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. नुकतेच किरण गायकवाड- वैष्णवी कल्याणकर, शाल्व किंजवडेकर व श्रेया डफळापूरकर, रेश्मा शिंदे, राजस सुळे हे कलाकार लग्नबंधनात अडकले. आता झी मराठीच्या एका लोकप्रिय मालिकेत बालकलाकार म्हणून झळकलेल्या अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. ‘या सुखांनो या’ ही झी मराठी वाहिनीवरील गाजलेली मालिका होय. २००५ ते २००८ या काळात ही मालिका प्रसारित झाली होती. या मालिकेत विक्रम गोखले, ऐश्वर्या नारकर, राजन भिसे, प्रिया मराठी, शर्वरी लोहकरे, गिरीश परदेशी या कलाकारांची मांदियाळी होती. या मालिकेत ऐश्वर्या नारकर व राजन भिसे यांच्या मुलीची भूमिका करणारी अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. हेही वाचा – शुभमंगल सावधान! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्याचा मोठ्या थाटामाटात पार पडला लग्नसोहळा, गेल्या नऊ वर्षांपासून होता रिलेशनशिपमध्ये ‘या सुखांनो या’ मालिकेत ऐश्वर्या नारकर आणि राजन भिसे यांची मुलगी समीरा अधिकारी हे पात्र साकारणारी बालकलाकार श्रद्धा रानडे (Shraddha Ranade Wedding) हिचं लग्न झालं आहे. श्रद्धा रानडे नुकतीच विवाहबद्ध झाली. तिच्या लग्नाचे फोटो अभिनेत्री अन्वीता फलटणकर हिने शेअर केले आहेत. श्रध्दाच्या लग्नात अन्वीता पाठराखीण होती. हेही वाचा – Video: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या सक्सेस पार्टीत महेश कोठारेंचा ‘झपाटलेला’ चित्रपटातील गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ A post shared by Anvita Phaltankar ? (@anvita_phaltankar) अन्वीताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पाठराखीण म्हणून काही जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत आहे. तसेच संगीत सोहळ्यात तिने व श्रद्धाने केलेल्या डान्सचे फोटोदेखील पाहायला मिळत आहेत. हेही वाचा – Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो े श्रद्धा रानडे हिने ‘भाग्यविधाता’, ‘ममता’ ,’या सुखांनो या’, ‘खेळ मांडला’ या मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं होतं. पण ‘या सुखांनो या’ मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली. तिने मालिकांशिवाय अनेक जाहिरातीदेखील केल्या होत्या. श्रद्धाने भरतनाट्यमचे धडेही गिरवले आहेत. श्रद्धाने डी जी रुपारेल कॉलेजमधून कॉमर्स विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. आता श्रद्धाने लग्नगाठ बांधत नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. चाहते तिला आयुष्यातील या नवीन इनिंगसाठी शुभेच्छा देत आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.