MANORANJAN

Singer Shaan : प्रसिद्ध पार्श्वगायक शान राहत असलेल्या निवासी इमारतीला आग, ८० वर्षांची महिला गंभीर

Fire At Singer Shaaan’s Building : मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायल मिळत आहे. अशात मंगळवारी पहाटे वांद्रे पश्चिम येथील फॉर्च्यून एन्क्लेव्ह या निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागली होती. दरम्यान, याच इमारतीच्या अकराव्या मजल्यावर बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक शानचे निवासस्थान आहे. ही आग लागली तेव्हा शान घरात होता की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही. #WATCH | Mumbai, Maharashtra: Fire broke out in singer Shaan's residential building. Fire tenders on the spot. Further details awaited. pic.twitter.com/qWsmCggrf8 या आगीनंतर इमारतीतील एका ८० वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या महिलेची प्रकृती गंभीर असून, ती आयसीयूमध्ये असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. हे ही वाचा : आमच्याकडे मान-अपमान मनात होतो अन् त्याचं संगीत…”, देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी! पहाटे १.४५ वाजता फॉर्च्यून एन्क्लेव्ह या निवासी इमारतीला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानंतर ही आग विझवण्यासाठी व तेथे राहत असलेल्यांची सुटका करण्यासाठी अग्निशमन विभागाने १० गाड्या पाठवल्या होत्या. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेचा पोलीस आणि अग्निशमन दल कसून तपास करत आहेत. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे. दरम्यान एका वेगळ्या घटनेमध्ये काल (२३ डिसेंबर) मानखुर्द घाटकोपर जोडमार्गावरील मंडाळा परिसरातील भंगाराच्या गोदामांना सायंकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली होती. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, ६ ते ७ गोदामांचे मोठे नुकसान झाले. मंडाळा परिसरातील एका गोदामात सुरुवातीला आग लागली होती. त्यानंतर काहीच क्षणातच ही आग आसपासच्या गोदामांत पसरली. त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरू लागले. गोदामांना लागून अनेक झोपड्या असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या आगीच्या घटनेची माहिती नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, संबंधित विभाग कार्यालयातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्याला सुरुवात केली. अग्निशमन दलाने ७ वाजून ८ मिनिटांनी आगीला क्रमांक एकची वर्दी दिली. अग्निशामकांनी अनेक प्रयत्न करूनही आग आटोक्यात आली नाही. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलातर्फे ७ वाजून ३७ मिनिटांच्या सुमारास क्रमांक दोनची वर्दी देण्यात आली. अग्निशामकांकडून सोमवारी रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.