MANORANJAN

“हे रिअल लाईफ प्रेम…”, गोविंद नामदेव यांनी ३९ वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट करण्याच्या चर्चांवर सोडलं मौन

Govind Namdev Shivangi Verma : ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांनी चित्रपटांसह हिंदी मालिकांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी करिअरमध्ये अनेकदा नकारात्मक भूमिका वठवल्या आहेत. सध्या ते त्यांच्या कामामुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. मागील काही काळापासून ७० वर्षीय गोविंद नामदेव ३१ वर्षीय अभिनेत्री शिवांगी वर्माला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता त्यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. शिवांगी वर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती गोविंद यांच्याबरोबर पोज देत होती. या फोटोबरोबर तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ”प्यार की कोई उम्र नहीं होती, कोई सीमा नहीं होती” असे कॅप्शन तिने दिले होते. त्यामुळे या दोघांबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगल्या. अखेर गोविंद नामदेव यांनी याबद्दल मौन सोडले आहे. हेही वाचा – नेटफ्लिक्सवर या आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सिनेमांची यादी; १० पैकी ७ भारतीय चित्रपट तुम्ही पाहिलेत का? गोविंद यांनी शिवांगीबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी या अफवांबाबत स्पष्टीकरण दिलं. त्यांनी पत्नी सुधाचादेखील उल्लेख केला. सुधा माझा श्वास आहे, असं ते म्हणाले. हे रिअल लाईफ प्रेम नाही, तर रील लाईफ आहे! “गौरीशंकर गोहरगंज वाले” नावाचा एक चित्रपट आहे. याच चित्रपटाचे शूटिंग आम्ही इंदूरमध्ये करत आहोत. यामध्ये एक वृद्ध व्यक्ती तरुण अभिनेत्रीच्या प्रेमात पडते. मी वैयक्तिकरित्या तरुण किंवा वृद्ध व्यक्तीच्या प्रेमात पडेन, असं या जन्मात तरी शक्य नाही. माझी सुधा, माझा श्वास आहे! या जगातील सगळ्या गोष्टी तिच्यासमोर फिक्या आहेत, असं कॅप्शन लिहून त्यांनी शिवांगीबरोबर त्यांचं नाव जोडून अफवा पसरवल्या जात आहेत, त्यावर प्रतिक्रिया दिली. हेही वाचा – करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकत्र; फोटो पाहून चाहते म्हणाले, “गीत व आदित्य…” A post shared by GOVVIND NAMDEV (@realgovindnamdev) गोविंद नामदेव यांनी स्पष्ट केलंय की ते व शिवांगी डेट करत नाहीयेत. दोघेही एका चित्रपटात एकत्र काम करत आहेत, ज्यामध्ये त्यांच्या पात्रांचा रोमँटिक अँगल आहे. याचा दोघांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंध नाही. हेही वाचा – Video: जितेंद्र ४१ वर्षे जुन्या गाण्यावर थिरकले, तर लेक एकता कपूरचा ‘ऊ लाला’वर जबरदस्त डान्स गोविंद नामदेव हे लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी ‘ओएमजी’, ‘ओह माय गॉड 2’, ‘बँडिट क्वीन’, ‘सत्या’ आणि ‘सिंघम’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.