Tata Play Fiber: सध्या मार्केटमध्ये एअरटेल, जिओ यांचा दबदबा आहे. मोबाईल रिचार्ज, डेटा प्लानपासून ते फायबर सेवेपर्यंत अनेक सेवा कमी पैशात पुरवल्या जातात. पण आता एका कंपनीमुळे एअरटेल, जिओ यांचं टेन्शन वाढवलं आहे. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या टाटा प्ले फायबरने आपल्या यूजर्ससाठी हाय स्पीड डेटा प्लॅन लाँच केला आहे, ज्यामध्ये यूजर्सना अनेक OTT ॲप्स विनामूल्य वापरता येणार आहेत. टाटा प्लेचा हा प्लॅन एअरटेल आणि जिओच्या ब्रॉडबँड प्लॅनला टक्कर देणारा आहे. कंपनी सध्या त्यांच्या यूजर्सना 1 महिना, 3 महिने, 6 महिने आणि 12 महिन्यांची वैधता असलेले प्लॅन ऑफर करतेय. या प्लॅन्समध्ये यूजर्सना 100 एमबीपीएसच्या हाय स्पीडवर इंटरनेट दिले जात आहे. तसेच त्यांना OTT ॲप्समध्ये मोफत वापरता येणार आहे.टाटा प्ले फायबरच्या एका महिन्याच्या प्लॅनसाठी यूजर्सना फक्त 900 रुपये खर्च करावे लागतील. यात कंपनी 100Mbps वर लाइट, प्राइम आणि मेगा प्लॅन ऑफर करतेय. 900 रुपयांमध्ये तुम्हाला कंपनी पूर्ण महिन्यासाठी 100Mbps लाइट प्लॅन ऑफर करतेय. एवढंच नव्हे तर तुम्ही 12 महिन्यांचा प्लॅन घेतला तर तुम्हाला दरमहा 750 रुपये लागतील. जर एकाचवेळी संपूर्ण वर्षाचा प्लान घेतलात तर तुम्हाला जीएसटीसह 9,000 रुपये भरावे लागतील. टाटा प्लेच्या या फायबर ब्रॉडबँड प्लॅनमध्ये संपूर्ण महिन्यासाठी 3.3TB डेटा दिला जातो. OTT प्रेमींचा विचारदेखील यात करण्यात आलाय. Apple TV+, Disney+ Hotstar यासह 4 ॲप्स तुम्हाला वर्षभर मोफत वापरता येणार आहे. याव्यतिरिक्त 200 हून अधिक थेट टीव्ही चॅनेल विनामूल्य ऑफर करण्यात आले आहेत. टाटा प्ले फायबरच्या प्राइम प्लॅनमध्ये यूजर्सना एका महिन्यासाठी सुमारे 800 रुपये मोजावे लागतील. हा प्लॅन 12 महिन्यांसाठी असून यासाठी तुम्हाला 9,600 रुपये अधिक GST ची रक्कम द्यावी लागेल. यामध्ये यूजर्सना 6 OTT ॲप्स निवडण्याचा पर्याय असेल. या प्लॅनमध्ये यूजर्सना लाइट प्लॅनसारखे इतर अनेक फायदे मिळतील. मेगा प्लानमध्ये यूजर्सना एका महिन्यासाठी 950 रुपये मोजावे लागतील. या प्लॅनसाठी युजर्सना 11 हजार 450 रुपये अधिक जीएसटी खर्च करावा लागेल. या प्लॅनमध्ये युजर्सना सर्व ओटीटी ॲप्समध्ये प्रवेश मिळेल. एवढेच नव्हे तर तुम्हाला 200 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्सही पाहता येणार आहे. None
Popular Tags:
Share This Post:
आधी खातेवाटपावरुन आता बंगलेवाटपावरुन मंत्री नाराज? कारणं वाचून डोक्याला मारुन घ्याल हात
December 24, 2024Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
December 24, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
LIVE Updates : संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातून : धनंजय मुंडे
- By Sarkai Info
- December 20, 2024
Featured News
Latest From This Week
ऑस्करच्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर, आता 'अनुजा' कडून अपेक्षा
MARATHI
- by Sarkai Info
- December 20, 2024
अवघ्या 13 गुंठे जमिनीसाठी शेतकऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, धाराशीवमध्ये पवनचक्की गुंडांची दहशत
MARATHI
- by Sarkai Info
- December 20, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.