MARATHI

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली, पुन्हा नवा संघर्ष उभा राहणार?

Ajit Pawar NCP Leaders Conflict: छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातले दोन बडे नेते आहेत. मात्र या दोन्ही नेत्यांमध्येच जुंपली आहे. माणिकराव कोकाटेंनी केलेल्या टीकेला छगन भुजबळांनी खास स्टाईलनं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे भुजबळ - कोकाटे हा नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. छगन भुजबळांना मंत्रीपद न दिल्यानं ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांच्याच पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकोटे यांनी त्यावरून भुजबळांना डिवचलंय. भुजबळ नाराज असतील तर सोडून द्या, त्यांचे किती लाड पुरवायचे असा थेट सवालच कोकाटे यांनी केला होता. मात्र यावरून माजी मंत्री छगन भुजबळ प्रचंड भडकलेत. माणिकराव कोकाटेंना आपणच राष्ट्रवादीत आणल्याची आठवण भुजबळांनी त्यांना करून दिली. इतकंच नाही तर पक्षाच्या संस्थापकांपैकी आपण एक होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. यावरच न थांबता कोकाटेंचा थेट उपरे असा उल्लेख भुजबळांनी केलाय. राष्ट्रवादी अजितदादांच्या पक्षातीलच दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. माणिकराव कोकाटेंना राष्ट्रवादीत आणण्याचा किस्सा छगन भुजबळ ऐकवत असले तरी एकेकाळी नाशकातील या दोन नेत्यांमधून विस्तवही जात नव्हता. माणिकराव कोकाटे हे छगन भुजबळांचे राजकीय विरोधक मानले जातात. भुजबळांच्या धोरणावर आणि कार्यपद्धतीवर कोकाटेंनी अनेकदा टीका केलेली आहे. आता पुन्हा एकदा कोकाटे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणात धनंजय मुंडे कनेक्शन असल्याचा थेट आरोप विरोधकांकडून केला जातोय. देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या अटकेसाठी मोर्चे काढणाऱ्या विरोधकांनी आता धनंजय मुंडेंविरोधात आघाडी उघडलीये. देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेत या प्रकरणात अनेक मागण्या केल्याचं पाहायला मिळतंय.. वाल्मिक कराडवर कलम 302 लावण्यासोबत मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केलीय.एकीकडे शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची भेट घेतली.. तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली.. तपासाआधीच एखाद्याचं नाव घेणं चुकीचं असल्याचं अजितदादांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंनी म्हटलंय. सरपंच संतोष देशंमुख हत्यया प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालाय.. देशमुख यांचे मारेकरी हे खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या जवळचे आहेत.. आणि वाल्मिक हा मंत्री धनंजय मुंडेंचा जवळचा आहे.. हे धनंजय मुंडेंनी स्वतः कबूल केलंय. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत धनंज मुंडेंनी राजीनामा द्यावा ही मागणी जोर धरू लागलीय.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.