MARATHI

गोपीनाथरावांनी असं राजकारण कधी केलं नाही, धनजंय मुंडेंनी राखेतून पैसा...; सुरेश धसांचा खळबळजनक आरोप

Suresh Dhas On Dhananjay Munde: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बीड जिल्हा चर्चेचा विषय ठरतोय. बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच हा मुद्दा उचलून धरला आहे. आमदार सुरेश धस यांनी झी 24 तासच्या टु द पॉइंट कार्यक्रमांत राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सुरेश धस यांनी गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडेंनी हावरटपणाचे राजकारण केले, असा आरोप त्यांनी केला आहे. 24 तास'च्या 'टू द पॉईंट' या विशेष कार्यक्रमात सुरेश धस यांनी हा आरोप केला आहे. हावरटपणाचे राजकारण धनंजय मुंडेंनी केलं. धनंजय मुंडेंनी वाळुतून पैसा, राखेतून पैसा कमावला असून घरकुलांसाठी त्यांनी 10-10 हजार रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत केला आहे. 'धनंजय मुंडे हे ग्रीडी पॉलिटिक्सवाले आहेत. हाव आणणारे राजकारण धनंजय मुंडे यांच्याकडून झाले. मुंडे साहेबांच्या पुढच्या पिढीकडून हे हावरट राजकारण झालं. तुम्हाला वाळुतून पैसा पाहिजे, राखेतून पैसे पाहिजे. विंड पॉवरचे कोणी कंपन्या आल्या तर त्यांच्याकडून पैसा पाहिजे, DPDCतून पैसा पाहिजे,' असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे. तसंच, 'वंजारी समाजासाठी यशवंतराव चव्हाण नावाची योजना काढली. त्यात 24 हजार घरकुलं दिली. मला असं वाटतं काही काही घरकुलं 10 हजारांना विकलंय. त्या त्या सरपंचांनी 10-10 हजार घरकुलांसाठी गोळा केले. ती यादीपण मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे. ज्यांचे स्लॅबचे घरे आहेत त्यांना पण घरकुलं मंजुर करुन देण्यात आले आहेत. म्हणजे फक्त ते बोगस पैसे उचलायचे. 24 हजार घरकुलांपैकी सगळे घरे वंजारी समाजाला द्यायचे तर सगळ्या वंजारी समाजाच्या गावाला द्यायचे ना. ठराविक कार्यकर्ते आणि जे दहा हजार यांच्याकडे नेऊन देतील त्याच गावांना यांनी 100-150 घरे दिले.असे राजकारण गोपीनाथ मुंडेंनी कधीच केले नाही,' असंदेखील त्यांनी म्हटलं आहे.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.