MARATHI

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव?

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील व देशभरातील ठळक घडामोडी जाणून घेऊया एका क्लिकवर Maharashtra Breaking News LIVE Updates : बीड सरपंच हत्याकांडातील घडामोडींना वेग आला आहे. या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यातील व देशातील सर्व घडामोडींचा वेगवान आढावा या लाइव्ह ब्लॉगमधून घेऊयात. 7 Jan 2025, 10:09 वाजता Maharashtra Breaking News LIVE Updates: सौदी अरेबियामध्ये मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर, मक्का मदीनापर्यंत साचलं पाणी, पुरात अनेक गाड्या गेल्या वाहून, पुढील 24 तास रेड अलर्ट 7 Jan 2025, 10:08 वाजता शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत करणार भाजपमध्ये प्रवेश 7 Jan 2025, 10:01 वाजता Maharashtra Breaking News LIVE Updates: दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होणार. दुपारी 2 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद. 7 Jan 2025, 09:01 वाजता Maharashtra Breaking News LIVE Updates: वाघीण-बछड्यांचा मार्ग अडवल्याप्रकरणी नागपूर खंडपीठात सुमोटो दाखल. दोन दिवसात मुख्य वनसंरक्षकांना उत्तर देण्याचे आदेश 7 Jan 2025, 08:27 वाजता नागपुरात एचएमपीव्ही विषाणूचे 2 संशयित रुग्ण सापडल्याची माहिती समोर येत आहे. 7 आणि 14 वर्षाच्या बालकांना HMPV ची लागण झाल्याचा संशय. मात्र प्रशासनाकडून अद्याप याला दुजोरा देण्यात आलेला नाही 7 Jan 2025, 08:18 वाजता मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील व्यक्तीचा डोक्यात नारळ पडून मृत्यु झाला. जयेश पांडुरंग गीते असे 48 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. देवपूजेसाठी मुरुडच्या बाजारात शहाळे आणण्यासाठी गेला असता झाडावरून नारळ त्याच्या डोक्यात पडून तो गंभीर जखमी झाला त्यातच त्याचा मृत्यू झाला. 7 Jan 2025, 08:13 वाजता टोमेटो, बटाट्यासारख्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने डिसेंबरमध्ये घरगुती अन्न महाग झाले. सोमवारी एका अहवालात ही माहिती दिली. क्रिसिलच्या उपकंपनीनुसार, शाकाहारी थाळी तयार करण्याचा सरासरी खर्च डिसेंबरमध्ये ६% वाढून ३१.६ रुपये प्रति प्लेट झाला आहे. 7 Jan 2025, 08:09 वाजता मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने ४ कोटी रुपयांच्या गांजाच्या तस्करीचा पर्दाफाश केला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. बँकॉकहून येणाऱ्या विमानात प्रवाशाकडे अमली पदार्थ असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती 7 Jan 2025, 08:08 वाजता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील 36 विभाग अध्यक्ष यांची त्याचबरोबर नेत्यांची शिवतीर्थावर बैठक राज ठाकरे यांच्या नेतृत्वात बैठक होणार असून मुंबई महापालिका निवडणुका तयारी विषयी घेतला जाणारा आढावा सकाळी दहा वाजता सुरू होणार बैठक. 7 Jan 2025, 06:49 वाजता पाटणा, पश्चिम बंगाल येथे आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे सकाळी 6.37 वाजता 15 सेकंदासाठी भूकंपाचे धक्के जाणवले. तर, जलपाईगुडी येथेदेखील भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून तिबेट-नेपाळ सीमेलगत भूकंपाचे केंद्र असल्याचे समोर आले आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.