MARATHI

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 07 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर. 7 Jan 2025, 10:08 वाजता Raigad : रायगड जिल्ह्यात महिलांवरील अत्‍याचारांच्‍या घटनांमध्‍ये लक्षणीय वाढ झाली आहे. मागील वर्षात बलात्काराच्या १०७ घटना समोर आल्या. धक्‍कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे यातील ७४ प्रकरणे ही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची होती. म्हणजेच जिल्ह्यात दाखल होणाऱ्या बलात्‍कारांच्‍या गुन्‍हयात ७३ टक्के गुन्हे हे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराशी निगडीत असल्‍याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मागील काही वर्षांपर्यंत रायगड जिल्ह्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे वर्षाला ५० गुन्हे दाखल होत होते. गेल्या तीन वर्षात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. जिल्ह्यात वार्षिक १०० हून अधिक गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. यातही पॉक्‍सोअंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. बातमीचा व्हिडीओ पाहा - 7 Jan 2025, 09:43 वाजता Gondia Wood Seized : सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकऱ्याला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिका-यांनी सागवान लाकडाच्या अवैध वाहतुकीवर कारवाई केली. शेंडा परिसरातल्या जंगलातून हे सागवान लाकूड अवैधरित्या नेलं जात होतं. वन अधिका-यांनी फुटाळा गावाजवळ वाहनाला थांबवत तपासणी केली तेव्हा मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड आढळलं. लाकूड कुठून आणलं, याची कागदपत्रे विचारली असताना चालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे हा लाकूड चोरीचा असल्याचं निष्पन्न झालं. वन विभागाने 3 आरोपींसह लाकूड, वाहन जप्त केले. यात आणखी काही आरोपी असून ते फरार आहेत त्यांचा शोध वनविभाग घेतंय... बातमीचा व्हिडीओ पाहा - 7 Jan 2025, 09:23 वाजता Manoj Jarange : मंत्री धनंजय मुंडेंविरोधात वक्तव्य करणं मनोज जरांगेंना महागात पडलंय. जरांगेंविरोधात बीड जिल्ह्यात 8 अदखलपात्र गुन्हे दाखल झालेत. परभणीतील आक्रोश मोर्चात जरांगेंनी धनंजय मुंडेंविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मुंडे समर्थक आक्रमक झालेत. 24 तासात 8 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत. अंबाजोगाई, परळी ग्रामीण, सिरसाळा, केज, धारूर आणि गेवराई येथील पोलिस ठाण्यात जरांगे यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आलेत. बातमीचा व्हिडीओ पाहा - 7 Jan 2025, 09:01 वाजता Parbhani Meghana Bordikar On HMPV : HMPVशी लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सज्ज आहे अशी प्रतिक्रिया सार्वजनिक आरोग्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलीये.. भारतात या विषाणूचे 5रुग्ण आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र नागरिकांनी घाबरून जाऊनये.. काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय... 7 Jan 2025, 08:41 वाजता Tuljapur : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे. दुपारी बारा वाजता विधिवत पूजा करून घटस्थापनेने या उत्सवाला प्रारंभ होणार आहे. पुढील सात दिवस म्हणजे 14 जानेवारी पर्यंत आई तुळजाभवानीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दरम्यान आज पहाटे सात दिवसाची मंचकी निद्रा संपवून देवी सिंहासनावर विराजमान झाली. मानाच्या पुजाऱ्यांनी विधिवत पूजा करून देवीच्या मूर्तीची मंदिराला प्रदक्षिणा घालत तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली बातमीचा व्हिडीओ पाहा - 7 Jan 2025, 08:32 वाजता Mumbai Firing : मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाबाहेर गोळीबार झालाय.. मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी एका अंगाडिया व्यापा-यावर गोळीबार केला.. अंगडीया मौल्यवान दागिने घेऊन जाताना CSMTच्या मुख्य प्रवेशद्वारावर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.. या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीनं सैफ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गोळीबार करणारे पी डिमेलो मार्गावरुन माझगावच्या दिशेनं पळाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीये.. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीनं या आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणी MRAपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बातमीचा व्हिडीओ पाहा - 7 Jan 2025, 08:05 वाजता Mumbai Airport Ganja Seized : मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने ४ कोटी रुपयांच्या गांजाच्या तस्करीचा पर्दाफाश केला.या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. बँकॉकहून मुंबईत येणाऱ्या विमानात प्रवाशाकडे अमली पदार्थ असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने विमानाच्या बाहेर सापळा रचला होता. या विमानातून उतरणाऱ्या एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करत त्याच्या सामानाची तपासणी केली. प्लास्टिकच्या हवाबंद बॅगेत गांजा लपवल्याचं आढळलं. हा गांजा कुणासाठी आणला या संदर्भात त्याची चौकशी केली असता त्याने मुंबईतील एका व्यक्तीचं नाव सांगितलं. त्यापार्श्वभूमीवर दोघांना अटक करण्यात आली. बातमीचा व्हिडीओ पाहा - 7 Jan 2025, 07:56 वाजता NIA On Naxal Attack : नक्षलवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर आलीय. छत्तीसगडमध्ये काल नक्षलवादी हल्ल्यात 9 जवान शहीद झाले होते. विजापूरच्या अम्बेलीमध्ये मोठा स्फोट घडवून हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची राष्ट्रीय तपास यंत्रणा चौकशी करणारेय. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झालीय. बातमीचा व्हिडीओ पाहा - 7 Jan 2025, 07:43 वाजता Earthquake : उत्तर भारत भूकंपानं हादरलाय.. पश्चिम बंगालसह बिहारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत.. या भूकंपाचं केंद्र हे नेपाळमधील गोकर्ण भागात होतं.. या भूकंपाची तिव्रता 5.3 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आलीये. पश्चिम बंगालच्या सिलीगुडी, जलपायगुडीमध्ये सकाळी साडेसहाच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.. बातमीचा व्हिडीओ पाहा - None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.