Maharashtra Breaking News LIVE Updates : आज दिवसभरात कोणत्या घडामोडी लक्ष वेधणार? राज्यात बीड प्रकरणासमवेत आणखी कोणत्या बातम्यांवनजर असणार? पाहा... Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्यभरातील शिवसेना UBTच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पालघर, मुरबाड, नवी मुंबई, धुळे, बीड, परभणी जिल्ह्यतल्या शिवसेना UBTच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. महाराष्ट्रात या सर्व घडामोडी घडत असतानाच आठवड्याच्या सुरुवातीला आता बीड सरपंच हत्या प्रकरणात आणखी कोणत्या घटना लक्ष वेधणार, या संदर्भातील सर्व अपडेट एका क्लिकवर... 6 Jan 2025, 21:31 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्थगित झालेल्या उर्वरित बैठका उद्या 7 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. 7, 8 आणि 9 जानेवारी रोजी उर्वरित बैठका पार पडतील. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. 21 डिसेंबर रोजी मुंबईतील निरीक्षकांची बैठक पार पडली होती त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येत आहे. 6 Jan 2025, 20:21 वाजता कोणी काय आरोप करावेत, लोकशाहीने अधिकार दिलेत.मी आरोप करणाऱ्या प्रत्येकाचे तोंड दाबू शकत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. जे आरोप करताहेत, त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना प्रश्न विचारावा.महायुतीमध्ये भाजप चे असतील तर भाजपच्या पक्षाध्यक्षांना विचारावं. माझ्याकडे संशयाने बघितलं जाताहेत. त्यामुळे मी बोलणं योग्य नाही.चौकशी पूर्ण होऊ द्या, असेही ते म्हणाले. 6 Jan 2025, 19:37 वाजता पंकजा मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आज अमित शहा यांची भेट घेतली. 6 Jan 2025, 18:20 वाजता शासकीय कार्यालये, स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठा योजना शंभर टक्के सोलारवर होणार असून लवकरच शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याच धोरण असल्याचं सार्वजनिक आरोग्य,ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणीत सांगितलंय, यामुळे रात्री बेरात्री शेतकऱ्यांना दार धरण्यासाठी जावं लागणार नाहीये, आज राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर ह्या परभणी जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. शासनाच्या प्रत्येक योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजेत यासाठी मंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शासनाच्या वेगवेगळ्या योजनाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्यात, त्यानंतर त्यांनी ऊर्जा आणि आरोग्य विभागाची स्वतंत्र आढावा बैठक घेतली, आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील गरोदर माता, इतर गरजू रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी 6 आरोग्य केंद्रांना आंबूलन्स देण्यात आल्या आहेत, या अंबुलन्सचे उदघाटन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते आज करण्यात आले,सदर अंबुलन्समूळे गरजू रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहचून उपचार घेता येणार आहेत. 6 Jan 2025, 17:43 वाजता बीड हत्या प्रकरणात 3 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जयराम चाटे, प्रतिक घुले आणि महेश केदार असे आरोपींचे नाव आहे. 6 Jan 2025, 17:28 वाजता मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता बहुतांशी सुधारली आहे. वातावरणीय बदलांमुळे वायू प्रदूषणात वाढ आढळून आल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधकामांसंदर्भात कठोर पावले उचलली होती. त्याचा सकारात्मक परिणाम होवून वायू प्रदूषण नियंत्रणात आल्याने मुंबईत भायखळा, बोरिवली पूर्व या भागांमध्ये बांधकामांवर लावण्यात आलेली सरसकट बंदी आता हटवण्यात आली असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली. 6 Jan 2025, 17:25 वाजता दिल्लीच्या इंडिया गेटच नाव बदला, अशी मागणी भाजप अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले आहे. 6 Jan 2025, 16:33 वाजता दादरमध्ये गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक झाली आहे. स्टोरेस नावाच्या ज्वेलर्स कंपनीने कमी कालावधीत दुप्पट पैसे करून देण्याच्या नावाखाली पैसे घेतले.कालपासून दादरमधील हे दुकान बंद झाल्याने नागरिकांची दुकानासमोर मोठी गर्दी झाली आहे. आता पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 6 Jan 2025, 15:57 वाजता छत्तीसगडमधील विजापूरमध्ये सुरक्षा जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला. या हल्ल्यात 8 जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे. 6 Jan 2025, 15:56 वाजता काटोल मतदार संघातून विधानसभेत पराजय झालेले राष्ट्रवादी काँग्रेस चे सलील देशमुख व चरण वाघमारे यांच्यासह काही पराजित उमेदवार निवडणुक आयोगाच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली.काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या आठ पराभूत उमेदवारांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात आणखी भर टाकत सलील देशमुख आणि चरण वाघमारे सह काही पराभूत उमेदवारांनी याचिका दाखल केली. None
Popular Tags:
Share This Post:
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
January 7, 2025What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
Featured News
Tuesday Panchang : आज मंगळवारी शिव योग! हनुमानजी अशी करा पूजा
- By Sarkai Info
- January 7, 2025
मनोज जरांगे पाटील असं बोलले तरी काय? ओबीसी समाज इतका आक्रमक झाला
- By Sarkai Info
- January 6, 2025
Latest From This Week
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
'धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...', सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.