MARATHI

यापेक्षा स्वस्त आणखी कुठे? मुकेश अंबानींनी सोडलं 'ब्रम्हास्त्र'; 28 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लान!

Jio Recharge Plans: मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. भारतात जिओने एन्ट्री केल्यानंतर यूजर्सचा स्मार्टफोन वापरण्याच्या पद्धतीत क्रांती झाली आहे. जिओने गेल्यावर्षी 999 रुपयांमध्ये एक स्वस्त जीओ भारत व्ही 2 (JioBharat V2) फोन लॉन्च केला होता. आता कंपनीने 4जी फीचर फोनसाठी एक नवा प्रिपेड प्लान जाहीर केलाय. भारतामध्ये सर्वात स्वस्त कॉलिंग, 5 जी डेटा, ओटीटी सब्सस्क्रिप्शन आणि स्वस्त फोन देऊन भारतातील टेलिकॉम सेक्टरमध्ये क्रांती आणण्यासाठी ओळखले जातात. जिओ म्हणजे दरवेळेस काहीतरी नवं असणार, याबद्दल ग्राहकांना विश्वास असतो. त्यानुसार आता काय नवं आलंय? जाणून घेऊया. इतर टेलिकॉम कंपन्यांप्रमाणे रिलायन्स जिओने देखील स्वस्त प्लानसोबत अनलिमिटेड कॉल्स ऑफर केले आहेत. पण यासोबतच 42जीबी डेटा आणि एक ओटीटी सबस्क्रिप्शनदेखील दिले आहे. या प्लानची किंमत 299 रुपये इतकी आहे. यामध्ये तुम्हाला 28 दिवसांची मुदत मिळेल. यात तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स आणि खूप सारा डेटा मिळेल. या प्लानसोबत तुम्हाला 42जीबी डेटा मिळेल. तुम्हाला दररोज 1.5जीबी डेटा वापरता येईल.याशिवाय दररोज 100 एसएमएसदेखील ऑफर केले जातात. यासोबतच तुम्हाल जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड मिळेल. डेटा संपल्यानंतरही तुम्हाला 64 केबीपीएस स्पीड मिळेल. असे असले तरी जिओ सिनेमा प्रिमियम प्लान यात उपलब्ध नसेल, याची नोंद घ्या. हे हवे असेल तर तुम्हाला वेगळी जिओची मेंबरशिप घ्यावी लागेल. तुम्ही जिओचे ग्राहत असाल तर तुमच्यासाठी 28 दिवसांचा वॅलिडिटीचा एक प्लानदेखील आहे. ज्यामध्ये तुम्हाला दररोज 2जीबी डेटा मिळेल. तसेच 349 रुपयांच्या प्लानमध्ये 5जी प्लानदेखील आहे. या प्लानमध्ये तुम्हाला इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूप फायदा मिळेल. तुम्ही जिओचे एअरफायबर कनेक्शन घेऊ इच्छित असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. JIO च्या नव्या ऑफरनुसार तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची इन्स्टॉलेशन फीस घेतली जाणार नाही. ही ऑफर विशिष्ट कालावधीसाठी असणार आहे, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी. जिओचे सध्याच्या आणि नव्या ग्राहकांसाठी ही ऑफर लागू असणार आहे. जे यूजर्स 3 महिन्यांचे ऑल इन वन प्लान निवडतील,त्यांना 3 हजार 121 रुपयांचे पेमेंट करावे लागेल. याध्ये 2 हजार 121 रुपयांचा प्लान चार्ज आणि 1 हजार रुपयांचे इंस्टॉलेशन चार्जचा समावेश आहे.फ्रीडम ऑफरसोबतच नव्या युजर्सना या ऑफरअंतर्गत केवळ 2 हजार 121 रुपयांचे शुल्क भरावे लागेल. जिओने नुकतेच जिओ टॅग एअर लॉन्च केले आहे. यामुळे प्रवाशांना त्यांचे हरवलेले सामान सोशणे सोपे पडणार आहे. हे एक प्रकारचे ट्रॅकर असून लांबचा प्रवास करणाऱ्यांना याचा फायदा होतो. जिओने एक परवडणारा स्मार्ट ट्रॅकर आणला आहे. कोणाचे वैयक्तिक सामान हरवल्यास त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्याप्रकारे हे डिव्हाइस डिझाइन करण्यात आले आहे. यामुळे तुमचे सामान हरवले किंवा चोरीला जाण्यापासून वाचते. या डिव्हाइसमध्ये हरवलेले सामान शोधण्यासाठी नवी ट्रॅकींग सुविधा आहे.कार किंवा विविध वस्तूंमध्ये तुम्ही हे डिव्हाइस लपवून ठेवू शकता. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.