MARATHI

Kolkata Rape: आरोपीच्या मांडीवर जखमा! रेड लाईट एरियात S*x का टाळला? तपासात म्हणाला, 'माझ्याकडे...'

Kolkata Rape Case Sanjoy Roy Medical: कोलकात्यामधील आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमध्ये 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर 9 ऑगस्टच्या रात्री झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामधील प्रमुख आरोपी असलेल्या संजय रॉयची सध्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीदरम्यान अनेक खुलासे समोर आले आहेत. या घटनेनंतर संजयने जे जे काही केलं ते ऐकून पोलिसांचा गोंधळ अधिक वाढला आहे. पोलिसांनी त्याला आदल्या रात्री रेड लाइट एरियामध्ये गेल्यासंदर्भातही संजयला प्रश्न विचारले. 9 ऑगस्टच्या रात्री ही घटना घडल्यानंतर संजय रॉय सकाळी थेट फोर्थ बटालियन इथे गेला. तिथे जाऊन तो झोपला. त्यानंतर तो 10 ऑगस्टच्या सकाळी तो उठला तेव्हा त्याने मद्यपान केलं आणि तो पुन्हा झोपला. दुसरीकडे पोलिसांना शंका आल्याने त्यांनी ज्या ठिकाणी या तरुणीवर बलात्कार झाला आणि तिची हत्या करण्यात आली त्या सेमिनार हॉलच्या आजूबाजूच्या सीसीटीव्हीमधील फुटेज तपासून पाहिले. त्यावेळी यामध्ये संजयबरोबर अनेक व्यक्ती दिसून आल्या. कोलकाता पोलिसांनी या प्रकरणामध्ये सीसीटीव्ही तपासून पाहिल्यानंतर त्यामध्ये दिसलेल्या जवळपास 15 जणांची चौकशी केली. खास करुन रात्री 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास सीसीटीव्हीमध्ये दिलेल्या लोकांबद्दल चौकशी करण्यात आली. 4 वाजण्याच्या सुमारास संजय रॉयची झलक सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. हे सीसीटीव्ही फुटेज रुग्णालयामध्ये संजयबरोबरच काम करणाऱ्या सौरभ नावाच्या व्यक्तीच्या भावाला दाखवण्यात आलं. सौरभच्या भावाने संजयला ओळखलं. याच आधारे पोलिसांनी संजयचा शोध सुरु केला. सौरभने संजयला जेवणासाठी बोलावलं होतं. मात्र वाटेतच सौरभला त्याच्या भावाचा कॉल आला. त्याने पोलीस संजयचा शोध घेत असल्याचं सौरभला सांगितलं. त्यानंतर सौरभ आणि संजयची भेट झाली तेव्हा संजयने जेवण केलं नाही. मात्र सौरभने संजयला आर. जी. कर कॉलेजमध्ये एक कांड घडल्याचं सांगतानाच पोलीस तुझा शोध घेत आहेत असं सांगितलं. यावर संजयने, "मी पाहतो," असं उत्तर दिलं आणि त्यानंतर तो फोर्थ बटालियनला गेला आणि पुन्हा मद्यपान करुन झोपी गेला. नक्की >> Kolkata Rape Case: रात्री 2.45 ला पीडितेने केलेल्या रिप्लायमुळे गूढ वाढलं! महत्त्वाचा पुरावा कोलकाता पोलीस जेव्हा संजयला अटक करण्यासाठी फोर्थ बटालियन येथे पोहोचली तेव्हा तो दारुच्या नशेत होता. त्याला पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतर त्याने, "मला फाशी द्या" असं पोलिसांना म्हटलं. अटकेच्या दुसऱ्या दिवशी संजयच्या चेहऱ्यावर कोणताच पश्चाताप दिसत नव्हता. त्याने पोलिसांना सर्व प्रश्नांची शांततेत उत्तरं दिलं. यामध्ये त्याने घटनेनंतरचा घटनाक्रमही सांगितलं. त्या रात्री संजय ऑप्रेशन थेअटरमध्ये का गेला होता याचा पोलीस शोध घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय रॉय सेमिनार हॉल समजून ऑप्रेशन थेअटरमध्ये गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अटकेनंतर केलेल्या चौकशीमध्ये संजयने सांगितलेल्या घटनाक्रमाच्या आधारे आदल्या दिवशी चेतला रेड लाइट एरियामध्ये गेल्यानंतरही तू तिथे शरीरसंबंध का ठेवले नाहीस? तुझ्याबरोबर गेलेल्या सौरभने शरीरसंबंध ठेवले मग तू का नाही? असा प्रश्न संजयला विचारला. त्यावर संजयने, माझ्याकडे पैसे नव्हते असं उत्तर दिलं. मात्र पोलिसांना हे उत्तर पटलेलं नाही. पोलिसांच्या अंदाजानुसार आधीपासूनच संजयच्या डोक्यामध्ये काहीतरी शिजत होतं. नक्की वाचा >> Kolkata Rape: 'मी निर्दोष, मला..', आरोपीने रडत सांगितलं 'लाय डिटेक्टर टेस्ट'साठी परवानगी देण्याचं कारण मेडिकल चाचणीमध्ये संजयचा हात, मांड्यांवर ओरबाडल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत. यावरुन जेव्हा घटना घडली तेव्हा झटापट झाल्याचं अधोरेखित होत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस या प्रकरणामधील प्रत्येक घटनेचा आणि तपशीलाचा सखोल अभ्यास करत आहे. या प्रकरणामधील कोणतीच बाब नजरेतून सुटता कामा नये असा तपास यंत्रणेंचा प्रयत्न आहे.

KUW
VS
HK
146/5
(20.0 ov)
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.