MARATHI

Om Parvat Without Snow: देवभूमीत चाललंय काय! ओम पर्वतावरील बर्फ वितळला, OM ची आकृती गायब

OM Parvat: उत्तराखंडच्या पिथौरागढ येथील ओम पर्वत हे अनेक पर्यटकांसाठी आकर्षण आहे. येथे भेट देण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात. या पर्वतावर दिसणारे ओम हे अक्षर पाहण्यासाठी लाखो पर्यटकांची झुंबड उडते. मात्र, देशभरातली पर्यटकांना निराश करणारी एक बातमी समोर येत आहे. ओम पर्वतावरील सर्व बर्फ वितळण्यात आला आहे. त्यामुळं पर्वतावर दिसणारा ओम हा शब्दच गायब झाला आहे. आता फक्त तिथे निर्जन असा डोंगर दिसत आहे. वाढते तापमान आणि ग्लोबल वार्मिग यामुळं ही घटना घडली असावी, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर, स्थानिक रहिवाशीदेखील यामुळं चिंतेत पडले आहे. ओम पर्वत समुद्रसपाटीपासून 5900 मीटर म्हणजेच 19356 फुट उंचीवर आहे. पिथौरागढ जिल्ह्यात चीनच्या सीमेरेषेलगतच्या नाभीढांगपासून ओम पर्वतचे भव्य दिर्शन होते. सध्या संपू्र्ण जगात तापमान वाढीच्या समस्याला सामोरे जात आहे. तापमान वाढीमुळं हिमालय क्षेत्रातील बर्फ वेगाने वितळत आहे. त्यामुळंच ओम पर्वतावरील बर्फदेखील गायब झाला आहे. हिमालयमध्ये घडलेल्या या घटनेमुळं प्रत्येकजण चिंतेत आहे.हिमालयात सतत होणारे बांधकाम, वाढते तापमान, निसर्गासोबत छेडछाड यासगळ्यामुळं निसर्गाचा र्हास होत आहे. त्यामुळंच तापमानात वाढ होत आहे. स्थानिक पर्यावरणवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम पर्वतावरील बर्फ वितळणे ही खूप गंभीर घटना आहे. भविष्यातील संकेत आहेत. वैज्ञानिकांनीदेखील यावर अभ्यास करणे गरजेचे आहे. जेणेकरुन वेळेत हिमालयातील बर्फ वितळण्यापासून आपण वाचवू शकतो.पिथौरगढमध्ये कित्येक महिन्यांपासून नवीन बांधकामे सुरू आहेत. पर्यटनामुळं लोकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळं जलवायू बदलतोय. देशातील तापमान जर 3 डिग्री सेल्सियसपर्यंत वाढले तर 90 टक्के हिमालय वर्षभरातच वितळून जाईल. एका नवीन संशोधतान चिंतेत टाकणारा खुलासा करण्यात आला आहे. याबाबतचे आकडे क्लायमेटिक चेंज जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. तापमान वाढीचा सर्वात गंभीर परिणाम हा हिमालयाच्या परिसरात होणार आहे. पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठीही पाणी शिल्लक राहणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. सध्या भारत 80 टक्के हीट स्ट्रेसचा सामना करत आहे. जर हे थांबवायचे असल्यास पेरीस अॅग्रीमेंटतर्गंत वाढते तापमान दीड डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी करणे आवश्यक आहे. जर तापमान 3 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले तर अवस्था आणखी बिघडू शकते. हा अहवाल इंग्लंडच्या विद्यापिठ ईस्ट आंग्लियाने दिला आहे. हे सर्व अहवाल भारत, ब्राझील, चीन, मिस्त्र, इथियोपिया आणि घाणावर फोकस करतात. या सर्व भागात ग्लोबल वार्मिग आणि वाढत्या तापमानामुळं दुष्काळ, पूर, शेतीची बिकट अवस्था, जैवविविधता यासारखी संकट येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

KUW
VS
HK
26/1
(4.2 ov)
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.