MARATHI

हार्दिक पांड्याविरुद्ध रचला होता कट? आयपीएलमध्ये सर्व स्टेडिअममध्ये म्हणून केलं जात होतं ट्रोल

Hardik Pandya IPL 2025 : आयपीएलचा सतरावा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) फारसा समाधानकारक ठरला नव्हता. आता आयपीएल 2025 आधी मुंबई इंडियन्सच्या संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यात सर्वात मोठा बदल कर्णधारपदाबाबत असण्याची चर्चा सुरु आहे. एका रिपोर्टनुसार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुन डच्चू मिळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या नव्या हंगामाआधी खेळाडूंचा लिलाव (IPL Auction) पार पडणार आहे. त्याआधी मोठी घडामोड घडण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय. हार्दिक पांड्याविरोधात कट? या घडामोडी सुरु असतानाच एका रिपोर्टनुसार आयपीएलच्या गेल्या हंगामात हार्दिक पांड्याविरुद्ध ठरवून कट रचण्यात आला होता. निगेटीव्ह पीआर करत पांड्याला जाणूनबुजून ट्रोल करण्यात आलं होतं. याप्रकरणी रोहित शर्मावर खापर फोडण्यात आलं आहे. वास्तविक स्पोर्ट्सयारी नावाच्या एका बेवसाईटने एका व्हिडिओत हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सबाबत एक दावा केला आहे. या रिपोर्टनुसार रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स संघातील अनेक खेळाडूंना हार्दिक पांड्या कर्णधार व्हावा असं वाटत नव्हतं. आयपीएलच्या सतराव्या हंगामापूर्वी रोहित शर्माला काढून हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सची धुरा सोपवण्यात आली. पण यानंतर हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोलचा सामना करावा लागला. रिपोर्टनुसार हा देखील कटाचा एक भाग होता. हार्दिकसाठी निगेटिव्ह पीआरचा वापर करण्यात आला. जवळपास प्रत्येक स्टेडिअमवर हार्दिक पांड्याविरोधात घोषणा देण्यात आल्या होत्या. निगेटिव्ह पीआर म्हणजे एखाद्या व्यक्तीची प्रतिमा सोशल मीडियावर खराब करणं. याचाच वापर हार्दिक पांड्याविरुद्ध करण्यात आला. आयपीएल 2024 पूर्वी पाच वेळा जेतेपद मिळवून दिलेल्या रोहित शर्माची अचानक उचलबांगडी करण्यात आली. त्याच्या जागी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रेड करुन मुंबई इंडियन्सच्या संघात घेण्यात आलं. इतकंच नाही तर त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली. पण यामुळे मुंबईकर प्रेक्षकांमध्ये चांगलीच नाराजी पसरली होती. याचे पडसाद स्टेडिअममध्येही पाहायला मिळाले होते. र्ट्सयारीने दिलेल्या रिपोर्टनुसार सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याच्या विरोधात होते. पांड्याविरोधात रचलेल्या कटात रोहित शर्माचं नावही जोडलं जात आहे. या रिपोर्टमधून करण्यात आलेल्या आरोपात किती तथ्य आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नव्या हंगामात सूर्यकुमार कर्णधार? मिळालेल्या माहितीनुसार नव्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी नव्या खेळाडूची वर्णी लागू शके. टीम इंडियाच्या टी20 संघाचं नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवकडेच मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

CAN
(20.0 ov) 132/9
VS
NED
124/8 (20.0 ov)
Canada beat Netherlands by 8 runs
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.