MARATHI

प्रतीक्षा संपली! पैसे तयार ठेवा, 'या' तारखेला लाँच होतायत आयफोन 16 चे चार मॉडेल

iPhone 16 Launch Date: Apple युजर्समध्ये सध्या कमालीचा उत्साह पाहायला मिळत असून, निमित्त ठरत आहे ते म्हणजे दरवर्षीप्रमाणं सप्टेंबर महिन्यात होणारा Apple Event. यंदाच्या वर्षी Apple कडून बाजारात iPhone 16 ची न वी सीरिज लाँच करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, 9 सप्टेंबर रोजी अखेर आयफोनचं नवं मॉडेल सर्वांसमोर येणार आहे. त्यामुळं आता आयफोनचे फिचर्स आणि लूक लीक होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे हे खरं. Apple नं नव्या मॉडेल लाँच संदर्भातील माहिती देताना एक कमाल मेसेजही लिहिला आहे. "It is Glowtime" असं म्हणत आता फोनसाठी उत्सुक असणाऱ्यांची उत्सुकता अॅपलनं आणखी ताणून धरली असून, आता हा फोन नेमका कसा आणि किती 'ग्लो' करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. आता अॅपल त्यांच्या या बहुप्रतिक्षित लाँच इव्हेंटपूर्वी फोनसंदर्भातील नेमकी कोणती माहिती समोर आणून युजरचं लक्ष वेधतो यावर सर्वांच्या नजरा असतील. अॅपल प्रेमींसाठी ही कंपनी iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max हे मॉडेल लाँच करणार असून, या फोनच्या स्टँडर्ड मॉडेलमध्ये कमीजास्त प्रमाणात फरक दिसून येतील; पण, प्रो मॉडेलमध्ये मात्र बरेच अपग्रेड मिळणार आहेत. अॅपलच्या या सर्व नव्या मॉडेलमध्ये Apple Intelligence फिचर मिळणार असून, पहिल्यापेक्षा अधिक वेगानं फोन चार्ज होण्याची क्षमताही इथं अपग्रेड करून मिळणार आहे. नव्यानं लाँच होणाऱ्या आयफोनच्या किमती अद्याप अॅपलनं जाहीर केलेल्या नाहीकत. पण, iPhone 16 चं बेस मॉडेल अंदाजे $799 (भारतात ₹67,100), iPhone 16 Plus $899 (भारतात ₹75,500), iPhone 16 Pro (256GB) $1,099 (भारतात ₹92,300) आणि iPhone 16 Pro Max (256GB) $1,199 (भारतात साधारण ₹1,00,700) इतकी असू शकते. या संभाव्य किमती असून, अधिकृत किमतींची घोषणा अॅपलच्या इव्हेंटमध्येच केली जाईल असं म्हटलं जात आहे. Apple Park मध्येच अॅपलचा हा मेगाइव्हेंट पार पडणार असून, लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून हा इव्हेंट अनेकांनाच घरबसल्या पाहता येणार आहे. भारतात हा इव्हेंट रात्री 10.30 वाजता सुरू होणार आहे. Apple च्याच अधिकृत YouTube चॅनलवर हे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.