MARATHI

एका व्हेल माशाची Love Story! 13046 किलोमीटरचा प्रवास; पठ्ठ्या चक्क तीन समुद्र ओलांडून...

Viral News : एखादा मासा किंवा एखादा जलचर सरासरी किती अंतरापर्यंत पोहू शकतो? तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर? सध्या जगभरात सागरी प्रवास करणाऱ्या एका अशा जलचराची चर्चा सुरू आहे, ज्यानं हजारो किमी अंतराचा प्रवास करत आपली मादी मिळवली आहे. आश्चर्य वाटतंय? प्रजननासाठी चांगल्या मादीच्या शोधात एका हंपबॅक व्हेल माशानं पॅसिफीक समुद्रापासून हिंद महासागरापर्यंतचं अंतर ओलांडलं आहे. तीन महाकाय समुद्र ओलांडत या माशानं तब्बल 13046 किमी इतक्या अंतराता सागरी प्रवास केला आहे. मागील अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ या व्हेल माशांवर नजर ठेवत त्यांचा प्रवास ट्रॅक करत होते. 10 जुलै 2013 रोजी हा व्हेलमासा उत्तर कोलंबियातील पॅसिफीक महासागर क्षेत्रातील त्रिबुगा खाडीमध्ये दिसला होता. यानंतर 13 ऑगस्ट 2017 रोजी हाच व्हेल मासा पुन्हा एकदा पॅसिफिक महारागरात दिसला आणि त्यानंतर तो थेट 22 ऑगस्ट 2022 मध्ये हिंद महासागरातील जंजीबार कालव्यात दिसला. सहसा या प्रजातीचे व्हेल मासे दूरवरचा प्रवास करण्यासाठी ओळखले जातात, पण या व्हेल माशानं पृथ्वीच्या चारही बाजुंनी प्रवास करत प्रचंड मोठं अंतर ओलांडल्यानं संपूर्ण जग हैराण आहे. व्हेल माशाच्या अध्ययनाचा अभ्यास करणाऱ्या टेड चीसमॅन यांच्या माहितीनुसार आपल्यासाठी योग्य मादीचा शोध घेणं या एकमेव हेतूनं हा व्हेलमाशानं इतका मोठा प्रवास केला. सुरुवातीच्या काळात हा प्रवास कोलंबियाहून पूर्वेच्या दिशेनं पुढे गेला आणि त्यानंतर दक्षिणेकडील सागरी क्षेत्रातून तो पुढे मार्गस्थ झाला. या प्रवासादरम्यान व्हेल माशानं अटलांटिक महासागरामध्ये स्वत:साठी मादी शोधल्य़ा. तिथं या माशानं एकाहून अधिक माद्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पण, यात हा मासा अपयशी ठरला आणि त्यानं प्रवासाची दिशा बदलली. पुढे हा व्हेल माशानं हिंद महासागराच्या दिशेनं या व्हेल माशानं आपला प्रवास वळवला. अभ्यासकांच्या माहितीनुसार व्हेल मासा एका विशेष मार्गानं समुद्री प्रवास करत असून, दरवर्षी हा प्रवास उत्तरेपासून सुरू होऊन दक्षिणेकडे जातो आणि या प्रवासाचं सरासरी अंतर असतं 8000 किमी. इथं मात्र हा नर व्हेल मासा अपवाद ठरला असून, मादीच्या शोधात त्यानं अविश्वसनीय प्रवास केला.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.