MARATHI

Jio मुळे आता सिनेमा पाहणाऱ्यांची मज्जाच मजा! आलाय नवा कोरा जबरदस्त प्लान

Reliance Jio OTT Plans : सध्या OTT चा जमाना असल्याने प्रत्येकाला वेध लागतात ते विकेंडचे. असंख्य लोक पावसाळा असो किंवा हिवाळा घरात बसून आरामत टिव्ही समोर चित्रपट आणि सीरिज पाहणे पसंत करतात. पण जिओने त्यांचे काही प्लॅन बंद केल्यामुळे नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राइम सारख्या OTT प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रिप्शनचा प्रॉब्लेम झाला होता. टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या टॅरिफ प्लॅनच्या किमती वाढवल्या केल्यामुळे ग्राहकांचे बजेट कोलडमले होते. कंपनीने पोर्टफोलिओ अपडेट करताना प्लॅनचे दर वाढवल्यामुळे खिशाला कात्री लागली होती. पण आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आणलीय. कंपनीने काही नवीन प्लान लाँच केले आहेत. ज्यामध्ये तुम्हाला मनोरंजनाची जबरदस्त ऑफर मिळणार आहे. आम्ही तुम्हाला जिओच्या सर्वात वाजवी प्लॅनबद्दल आज सांगणार आहोत. ज्यामध्ये OTT प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन उपलब्ध असेल. याच्या मदतीने तुम्ही तुम्हाला हवा तेवढा ऑनलाइन कंटेंट पाहू शकणार आहात. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 1.5 GB डेटा, 100 SMS आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह वापरकर्त्यांना JioSaavn Pro चा ॲक्सेस देखील मिळणार आहे. या प्लानमध्ये यूजर्सना दररोज 2 जीबी डेटा, 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. उच्च किंमतीमुळे, त्याची वैधता देखील जास्त असणार आहे. या प्लानमध्ये यूजर्सना 84 दिवसांची वैधता मिळणार असून या प्लॅनमध्ये Disney+ Hotstar ॲपचे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध असणार आहे. Jio चा हा प्लान वापरकर्त्यांना दररोज 2 GB डेटा, 100 SMS आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा देणार आहे. तर हा प्लॅन 84 दिवसांसाठी असून यात Sony LIV आणि तुम्हाला पाहता येणार आहे. या तीन योजनांमध्ये JioTV, JioCloud आणि JioCinema चे सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. Jio ने JioBharat J1 नावाचा नवीन फीचर फोन देखील लॉन्च जिओने नुकताच लाँच केलाय. हा फोन खूप स्वस्त असून त्यात JioChat, JioTV, JioSaavn, JioPay आणि JioPhotos सारखे अनेक ॲप्स प्री-लोड केलेले आहेत. हा फोन तुम्हाला 1799 रुपयांमध्ये मिळणार आहे. याशिवाय जिओने या फोनसाठी दोन प्लॅनही लॉन्च केल्या आहेत. 123 रुपयांचा प्लान मध्ये दररोज 300 एसएमएस, अमर्यादित कॉलिंग आणि 0.5 जीबी डेटा मिळतो. हा प्लान 28 दिवसांच्या वैधत असणार आहे. तर दुसरा प्लॅन 1,234 रुपयांचा असून यात युजरला हे सर्व फायदे 336 दिवसांच्या वैधत असणार आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये JioSaavn, JioTV आणि JioCinema मध्ये मोफत पाहता येणार आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.