MARATHI

लहान बाळाला साखर आणि मीठ किती वर्षापर्यंत देऊ नये?

Baby Care Tips : लहान बाळ म्हणजे देवाघरचं फुलं...हे तान्हुल्य बाळ घरात आल्यावर त्या घराला खऱ्या अर्थाने घरपण येतं. जन्माला आलेलं बाळ हे वर्षभरापर्यंत आईच्या दुधावर असतं. आईच्या दुधातून त्याला पोषकतत्व मिळतात. बाळ जसं जसं मोठं होतं त्याला वरणाचं पाणी, टमाटर, गाजर, फळं आणि लापसी इत्यादी पदार्थांची चव दिली जाते. दुधासोबत वरच अन्न पदार्थ त्यांना देण्यात येतं. आजकाल नवीन ट्रेंड आलाय ज्यात तान्हुल्याला पहिल्यांदाच जेव्हा अन्नाची ओळख करु द्यायची असते त्यासाठी अन्न प्राशन हा सोहळा ठेवला जातो. ज्यात त्याला आंबट गोड, तिखट अशा सगळ्या पदार्थांची चव दिली जाते. यातील कोणते पदार्थ तो आवडतीने खातो त्यावर त्याची आवड ठरवली जाते. पण तुम्हाला माहितीये बालरोग तज्ज्ञ आणि घरातील मोठी मंडळी सांगतात की, लहान बाळाला मीठ आणि सारख देऊ नये. यामागील कारण आणि किती वर्षांपर्यंत बाळा मीठ आणि सारख देऊ नये याबद्दल जाणून घेऊयात. आरोग्य तज्ज्ञांनुसार लहान बाळाला किमान एक वर्षांपर्यंत मीठ आणि सारख देऊ नयेत. अन्यथा त्यांना गंभीर आजार होण्याची भीती असते. डॉक्टर आणि बालरोग तज्ज्ञांनुसार खरंतर एक वर्षापर्यंतच्या मुलांची पचनसंस्था पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांना फक्त द्रव पदार्थ खायला द्यायचे असतात. पण मीठ आणि साखर याचं सेवन केल्याने चिमुकल्यांचा किडनी, दात आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. खरं तर आईच्या दुधातून लहान मुलांची मीठाची गरज पूर्ण होत असते. 6 महिने ते एक वर्ष वयोगटातील मुलांना दिवसाला एक ग्रॅमपेक्षा जास्त मीठ देण्याची गरज नाही, असं तज्ज्ञ सांगतात. तर एक ते तीन वर्षे वयोगटातील मुलांना दिवसातून दोन ग्रॅम मीठाची आवश्यकता असते. 4 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना दिवसाला 3 ग्रॅम मीठापेक्षा जास्त देणे नुकसानदायक ठरतं. लहान मुलांनाही साखरेचा अतिरिक्त कधीही देऊ नयेत, असं तज्ज्ञ सांगतात. मुलांसाठी, नैसर्गिक गोष्टींमधून मिळणारी साखर ही पुरेशी मानली जाते. शिवाय त्यांना फळं आणि इतर पदार्थांमधून नैसर्गिक साखर मिळत असते. ती चिमुकल्यांसाठी पुरेशी मानली जाते. त्याशिवाय लहान बाळाला 8 महिन्यापर्यंत मध किंवा खजुराचं सरबत चुकूनही देऊ नका. A post shared by Mindful Parenting (@mindfulparenti_g) हाडं ठिसूळ होण्याचा धोका अन्नातून जास्त प्रमाणात मीठ दिल्यामुळे मुलांच्या हाडांसाठी नुकसानदायक असतं. यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवते. शरीरात पुरेसे कॅल्शियम नसल्यास हाडे कमकुवत होतात. डीहायड्रेशनचा धोका ज्या मुलांच्या आहारात सोडियमचं प्रमाण जास्त असतं त्या मुलांना डिहायड्रेशनचा त्रास निर्माण होतो. लहान मुलं बोलू शकतं नाही त्यामुळे त्यांना तहान लागलेली आपल्याला कळत नाही. अशावेळी हे बाळासाठी धोकादायक ठरु शकतं. किडनी स्टोनची समस्या शरीरात पाण्याची कमतरता असल्यास मुलांमध्ये किडनी स्टोन, शरीर दुखणं, बद्धकोष्ठता आणि यकृत खराब होण्याची भीती निर्माण होते. उच्च रक्तदाब/ हाय बीपीचा त्रास लहान मुलांच्या आहारात जास्त मीठ असल्यास त्यांच्या रक्तातील बीपीची पातळी वाढते आणि त्यामुळे हायपरटेन्शनची समस्या निर्माण होण्याची भीती असते. ही समस्या हृदयासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते. जर तुम्ही लहान मुलांना आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ किंवा साखर दिल्यास त्यांना अनेक शारीरिक परिस्थितींना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. यामध्ये लठ्ठपणा, दात गळणे आणि मधुमेह आजाराची भीती निर्माण होते. बाळाला साखर का देऊ नये? साखर अनेक रासायनिक प्रक्रियांद्वारे शुद्ध केली जातं, जी मुलांसाठी हानिकारक ठरु शकते. जास्त साखरेमुळे मुलांना क्षय आणि दात किडणे या सारखा समस्या होतात. जास्त साखरेमुळे रोगप्रतिकार शक्ती सुद्धा मुलांची कमी होते. संशोधनात असं दिसून आलं आहे की, जास्त साखरेचा आहार घेतलेल्या मुलांना हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी मधुमेह आणि लठ्ठपणाची आजार दिसून येतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.