MARATHI

Golden Globes 2025 च्या रेड कार्पेटवर पोहचली 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट'ची दिग्दर्शक, पायल कपाडियाने लगावला ग्लॅमरचा तडक

All We Imagine as Light: लॉस एंजेलिसमधील बेव्हरली हिल्टन येथे 82 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांची (Golden Globes 2025) सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाला जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. माध्यमातून या सेलिब्रिटींचे फोटो व्हिडीओ बाहेर येत आहेत. चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये उत्तम काम करणाऱ्यांना हा पुरस्काररूपी सन्मान मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. एरियाना ग्रांडे, ॲड्रिन ब्रॉडी आणि अँजेलिना जोलीसह जगभरातील सेलिब्रिटी गोल्डन ग्लोब्सच्या रेड कार्पेटवर ग्लॅमरस अवतारात दिसले. याच सोबत आपल्या भारताची दिग्दर्शिका पायल कपाडियाने (Payal Kapadia) गोल्डन ग्लोब 2025 च्या रेड कार्पेटवर तिच्या उपस्थिती दाखवली. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2025 हा भारतीय सिनेमासाठी एक खास आणि महत्त्वपूर्व क्षण आहे. याचे कारण 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' हा चित्रपट आणि त्याची दिग्दर्शिका पायल कपाडिया यांना मिळालेलं नॉमिनेशन. पायल कपाडियाच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटाने बरीच चर्चा केली. पायल कपाडियाच्या चित्रपटाला गोल्डन ग्लोबल अवॉर्ड्समध्ये दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे - पहिला सर्वोत्कृष्ट डायरेक्ट आणि दुसरा नॉन-इंग्लिश भाषेतील सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर. 2024 कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाने सर्वात प्रतिष्ठित ग्रँड प्रिक्स विजेतेपद जिंकले आहे. हे ही वाचा: 12 वर्षाच्या मुलीच्या बलात्काराचा बदला घेण्यासाठी कुवेतमधून बाप आला भारतात आणि... या समारंभाचे सूत्रधार कॉमेडियन निक्की ग्लेसर यांनी या वर्षीच्या प्रतिष्ठित पुरस्कार सीझनला अधिकृतपणे सुरुवात केली, ज्यात अँजेलिना जोली, एरियाना ग्रांडे आणि कोलमन डोमिंगो यांच्यासह हॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर ग्रेस केले. त्याचवेळी, पायल कपाडिया रेड कार्पेटवर कस्टमाइज्ड ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिने तिचे केस मेस्सी बनमध्ये बांधले होते. तिने हॉलिवूडच्या सर्वात मोठ्या अवॉर्ड शोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत अभिमानाने पोज दिली. हे ही वाचा: हिटमॅन निवृत्ती घेणार? रोहित शर्माने स्वतःच केलं स्पष्ट, म्हणाला..."काय निर्णय घ्यायचा..." Go get the ‘globe’ girl. #PayalKapadia #GoldenGlobes pic.twitter.com/cxuOi3kG9w — Devansh Patel (@PatelDevansh) January 6, 2025 हे ही वाचा: Video: 62 चेंडूत संपला कसोटी सामना, ठरली रक्तरंजित मॅच; खेळपट्टीवर फलंदाज रक्तबंबाळ! 82 व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सचे थेट प्रक्षेपण CBS आणि Paramount+ वर केले जाईल, तर भारतात ते Lionsgate Play द्वारे 6 जानेवारी रोजी संध्याकाळी 6:30 PM ET वर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध आहे.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.