भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. विनोद कांबळीची तब्बेत पुन्हा एकदा बिघडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विनोद कांबळी आरोग्याच्या समस्यांना सामोरे जात आहे. विनोद कांबळी यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना ठाण्यातील पालघर येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विनोद कांबळी याची सध्या डॉक्टर त्यांची काळजी घेत आहेत. नुकताच विनोद कांबळीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तो सचिन तेंडुलकरसोबत दिसत होता, ज्यामध्ये तो खूपच आजारी दिसत होता. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीबद्दल बरीच चिंता व्यक्त केली जात होती. सध्या आरोग्यासोबतच विनोद कांबळी यांची आर्थिक स्थितीही चांगली नाही. Today meet great cricketer vinod kambli sir in AKRUTI hospital pic.twitter.com/3qgF8ze7w2 — Neetesh Tripathi (@NeeteshTri63424) December 23, 2024 अलीकडेच एका चाहत्याने विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो रुग्णालयात भरती झाल्याच दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या सर्व आवश्यक चाचण्या केल्या जात असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. कांबळीने अलीकडेच एका यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्याला युरिन इन्फेक्शनचा गंभीर त्रास होत असल्याच सांगितल होतं. त्यामुळे गेल्या महिन्यात तो बेशुद्ध देखील झाला होता आणि आता हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. विनोद कांबळी हे अनेक आजारांनी त्रस्त आहेत, त्यांना हृदयविकाराचा झटकाही येऊन गेला आहे. दारूच्या व्यसनामुळे विनोद कांबळी यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. अलीकडेच, कांबळीची प्रकृती पाहून, टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव, त्याच्या 1983 च्या विश्वचषकाच्या सहकाऱ्यांसह, कांबळीला पुनर्वसनासाठी मदतीची ऑफर दिली. यानंतर 52 वर्षीय विनोद कांबळी यांनीही कपिल देव यांची ऑफर स्वीकारली आणि मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तो पुनर्वसनात जायला तयार झाला. कांबळी आतापर्यंत 14 वेळा पुनर्वसनासाठी गेला आहे.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
Popular Tags:
Share This Post:


Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
January 7, 2025What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
Featured News
Tuesday Panchang : आज मंगळवारी शिव योग! हनुमानजी अशी करा पूजा
- By Sarkai Info
- January 7, 2025
मनोज जरांगे पाटील असं बोलले तरी काय? ओबीसी समाज इतका आक्रमक झाला
- By Sarkai Info
- January 6, 2025
Latest From This Week
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
'धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...', सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.