MARATHI

बांगलादेशमध्ये मोठा राजकीय राडा; पंतप्रधान शेख हसीना देश सोडून भारतात दाखल

Bangladesh PM Sheikh Hasina Resigns : बांगलादेशमध्ये मोठा राजकीय राडा झाला आहे. पंतप्रधान शेख हसीना देश सोडून भारतात दाखल झाल्या आहेत. बांगलादेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. बांगलादेशमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. बांगलादेशमधील अस्थिर परिस्थिती सध्या पाहायला मिळतेय. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार सुरू आहे. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या ताब्यात गेली आहे. बांगलादेशमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणाव आणि हिंसाचार सुरु आहे. देशाातील लोकांमध्ये संतापाची मोठी लाट उसळली आहे. 20 लाख लोक पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे कूच करत असल्याच्या घोषणेनंतर बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांनी राजीनाम्याचे पत्र दिलं. नक्की वाचा >> आरक्षणामुळे पेटतोय बांगलादेश! PM देश सोडून पळाल्या; अराजकतेचं नेमकं कारण काय? शेख हसीना यांनी हेलिकॉप्टरमधून देश सोडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेख हसीना यांचे हेलिकॉप्टर भारतातील त्रिपुरा येथील आगरतळा विमातळावर लँड झाले आहे. शेख हसीना यांच्यासह त्यांची बहिण आणि काही कुटुंबिय देखील सोबत असल्याचे समजते. अशा स्थितीत भारत आपल्या मित्र राष्ट्राच्या विश्वासू नेत्याला आश्रय देणार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात होत आहे. बांग्लादेशमधील शेख हसीना यांच्या घरी आंदोलक घुसले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत-बांग्लादेश सीमेवर भारताच्या BSFने हाय अलर्ट जारी केला आहे. भारत बांगलादेश सीमेवरील मनकाचर आसाममधील सीमा सील करण्यात आली आहे.तर भारतीय परराष्ट्र मंत्रालय या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.

SL
(50.0 ov) 240/9
VS
IND
208 (42.2 ov)
Sri Lanka beat India by 32 runs
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.