MARATHI

800000 कोटींचा चुराडा! HMPV व्हायरसमुळे Share Market Crash; कोरोनापेक्षा डेंजर स्थिती

Share Market Crash : चीनमधून कोरोनापेक्षा भयंकर व्हायरची भारतात एन्ट्री झाली आहे. यामुळे भारताची चिंता वाढली आहे. भारतात HMPV चे 3 रुग्ण सापडले आहेत. कर्नाटकमध्ये आढळले दोन रुग्ण आढले आहेत. 3 महिन्याच्या मुलीसह 8 महिन्याच्या मुलालाही HMPVची लागण झाली आहे. गुजरातमध्ये तिसरा रुग्ण सापडला आहे. HMPV व्हायरच्या दहशतीमुळे शेअर मार्केट क्रॅश झाला आहे. शेयर बाजारात कोरोनापेक्षा डेंजर स्थिती पहायला मिळत आहे. गुंतवणूकदार धास्तावले 800000 कोटींचा चुराडा झाला आहे. 6 जानेवारी रोजी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. सोमवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने चांगलीच उसळी घेतली. मात्र, काही वेळातच भारतात HMPV चे रुग्ण सापडल्याचे वृत्त समोर आले आणि शेअर बाजारात खळबळ उडाली. बाजारात 1400 अंकांची घसरण झाली. पाहता पाहता शेअर मार्केटमध्ये 800000 कोटींचा चुराडा झाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1400 अंकांनी घसरला. निफ्टी निर्देशांक 365 अंकांनी घसरला. निर्देशांकातील सर्व समभागांनी लाल चिन्ह गाठले. मोठ्या समभागांची स्थिती बिकट दिसत होती. टाटा स्टील, एचडीएफसी बँक, अदानी पोर्ट्स, रिलायन्स यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्स 1400 अंकांनी घसरून आजच्या 77,782 अंकांच्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आला, तर निफ्टी 23,600 च्या खाली घसरला. इंडेक्सवरूल सर्व स्टॉक रेड अलर्टवर पोहचले. Tata Steel, HDFC Bank, Adani Ports, Reliance सारख्या बड्या कंपन्यांचे शेअर कोसळले. सेंसेक्स 1400 अंकांनी गडगडला आहे. चीनमध्ये पसरलेल्या एचएमपीव्ही या नवीन विषाणूचे भारतात तीन रुग्‍ण आढळल्याने शेअर मार्केटवर याचा परिणाम झाला. तिमाही निकालांपूर्वी गुंतवणूकदार सावध झाले आहेत. परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढत आहेत. भारतीय शेअरमार्केटवर याचा दबाव पडला आणि शेअर मार्केट गडगडला.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.