MARATHI

झोपेचे 'हे' वेळापत्रक फॉलो करा, राहाल आरोग्यदायी

Bed Time and Wake up Time : रात्री 8 वाजता झोपण्याची आणि सकाळी 4 उठण्यांची सवय लागणं खूप कठीण आहे. पण जर तुम्ही ही सवय स्वत: ला लावून घ्याल तर तुमचं रुटिनमध्ये सुधारणा होते. इतकंच नाही तर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होतो. यावर अभ्यास करणाऱ्यांचं म्हणणं आहे की ही सवय तुम्हाला सगळ्यात जास्त ऊर्जा देते आणि तुम्ही दिवसभर उत्साही राहतात. झोप आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. याशिवाय आपल्या लाइफस्टाइलचा महत्त्वाचा भागही आहे. जर तुम्हाला रात्री 8 वाजता झोपण्याची सवय असेल आणि त्यासोबत तुम्ही सकाळी 4 वाजता उठत असाल तर तुमचं शरीर हे नॅच्युरल सर्केडियन सायकलसोबत काम करू लागतं. त्यामुळे फक्त झोपेचे क्वालिटी सुधारत नाही तर त्यासोबत स्ट्रेस आणि एन्झायटी आणि थकवा सारख्या समस्या दूर होतात. रिसर्सनुसार, लवकर झोपणं आणि लवकर उठणाऱ्या लोकांचं हार्मोनल बॅलेन्स खूप चांगलं राहतं. त्यामुळे तुमच्या शरीरात असलेलं मेलाटोनिन आणि कोर्टिसोलचं योग्य ते समतोल ठेवण्यास मदत होते. त्यामुळे फक्त चांगली झोप येण्यास मदत होत नाही तर त्यासोबत मेटाबॉलिज्म देखील वाढतं. सकाळी 4 वाजता उठल्यानं लोकं जास्त प्रोडक्टिव आणि क्रिएटिव्ह होतात. ही वेळ मेडिटेशन आणि ध्यान करण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. या दरम्यान, तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय तुच्या गोलवर लक्ष केंद्रित करु शकतात. लवकर उठणारे लोकं दिवसभर खूप एनर्जेटिक राहतात कारण दिवसाची सुरुवात ही चांगली आणि पॉजिटिव्ह नोटवर होते. अनेक यशस्वी लोकं हे याच वेळी सकाळी उठतात. 1. चांगलं आरोग्य सकाळी लवकर उठल्यानं तुम्ही व्यायाम करण्यासाठी वेळ काढू शकतात. त्याचा तुमच्या शरिरावर आणि आरोग्यावर चांगला परिणाम होतो. 2. सकारात्म विचार दिवसाच्या सुरुवातीला मेडिटेशन केल्यानं तनाव कमी होतो आणि मानसिक शांती मिळते. 3. सेल्फी डिसिप्लिन ही सवय तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाण्यास मदत करते. 4. योग्य आहार सकाळी उठण्याच्या सवयीमुळे तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारण्यास मदत होते. 1. रात्री 8 वाजता झोपल्यानं स्क्रीन टाइम कमी होईल. 2. हल्का आणि पोषण असलेला आहार करा. 3. झोपण्याआधी मेडिटेशन किंवा पुस्तक वाचण्याची सवय लावा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.