MARATHI

लग्नाचे दागिने खरेदी करण्याची संधी, आज सोन्याचे दर स्थिर; वाचा 24 कॅरेटचे दर

Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा नरमाई दिसून येत आहे. वायदे बाजारात सोनं-चांदीच्या दरात घट झाल्याचे दिसत आहे. तर सराफा बाजारात दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असताना मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर मौल्यवान धातुच्या किंमतीत घसरण झाली आहे. MCX वर सोनं 154 रुपयांनी घसरून 77,163 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. शुक्रवारी सोनं 77,317 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. तर, चांदी आज 40 रुपयांनी घसरून 89,181 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. आज सोन्या चांदीचे दर स्थिरावले आहेत. भारतात डिसेंबरपासून लग्नसराईला सुरुवात झाली आहे. त्यामुळं भारतात सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. लग्नसराईच्या दिवसात सोन्याची मागणी वाढते त्यामुळं ग्राहकांचे सोनं-चांदीच्या दरांकडे सतत लक्ष असते. गेल्या काही दिवसांत सोनं-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. आज सोनं-चांदीचे दर स्थिर आहेत. आज सोनं-चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. 24 कॅरेट सोन्याचे दर 78,710 रुपये प्रतिग्रॅम स्थिरावले आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 72,150 रुपयांवर स्थिरावले आहेत. 18 कॅरेट सोन्याचे दर 59,030 रुपयांवर पोहोचले आहेत. ग्रॅम सोनं किंमत 10 ग्रॅम 22 कॅरेट 72, 150 रुपये 10 ग्रॅम 24 कॅरेट 78, 710 रुपये 10 ग्रॅम 18 कॅरेट 59,030 रुपये ग्रॅम सोनं किंमत 1 ग्रॅम 22 कॅरेट 7,215 रुपये 1 ग्रॅम 24 कॅरेट 7,871 रुपये 1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 903 रुपये ग्रॅम सोनं किंमत 8 ग्रॅम 22 कॅरेट 57,720रुपये 8 ग्रॅम 24 कॅरेट 62,968 रुपये 8 ग्रॅम 18 कॅरेट 47,224 रुपये 22 कॅरेट- 72, 150 रुपये 24 कॅरेट- 78, 710 रुपये 18 कॅरेट- 59,030 रुपये

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.