MARATHI

मुसळधार पावसामुळे कब्रीतून बाहेर आला २३ कोटी वर्षांपूर्वी पुरलेला दैत्याकार जीव!

233 million year old dinosaur fossil : पुरातत्त्व विभागानं आजवर केलेल्या अनेक निरीक्षणांच्या माध्यमातून गतकाळातील पृथ्वी आणि जीवन याविषयीची बरीच माहिती समोर आली आहे. अगदी अश्मयुगीन मानवापासून त्यानंतर मानवाची आधुनिक क्रांतीच्या दिशेनं होणारी वाटचाल या सर्वच गोष्टी संपूर्ण जगानं पाहिल्या. सध्या मात्र एका नैसर्गिक प्रक्रियेतून कैक कोटी वर्षांपूर्वीच्या रहस्याचा उलगडा झाल्यामुळं अनेकजण हैराण आहेत. ब्राझिल येथे नुकत्याच झालेल्या अतिमुसळधार पावसामुळं तब्बल 23 कोटी वर्षांपूर्वी काळाच्या आड गेलेल्या एका महाकाय डायनासोरचे अवशेष समोर आले आहेत. जाणकारांच्या प्राथमिक अंदाजानुसार हे जगातील सर्वाधिक जुन्या, सुरुवातीच्या डायनासोरचे अवशेष आहेत. ब्राझिलमधील दक्षिणेकडे असणाऱ्या रिओ ग्रांडे डो सुल येथे हा उलगडा झाला असून, संशोधक आणि अभ्यासकांची नजर इथं वळली आहे. हे जीवाश्म हेरेरासॉरिडे प्रजातीचं असून, साओ जोआओ डो पोलेसीनपाशी असणाऱ्या एका जलाशयानजीक ते आढळून आले. या भागामध्ये पावसाचं प्रमाण इतकं वाढलं, की त्यामुळं भूपृष्टावरून मातीचा गाळ मोठ्या प्रमाणात वाहू लागला आणि त्यामुळंच या जीवाश्मांचा उलगडा होऊ शकला. हा डायनासोर मांसाहारी असून तो ट्रायसिक काळादरम्यान पृथ्वीवर वावरत होता असं सांगितलं जात आहे. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार या डायनासोरची लांबी 8 फूट असून, ट्रायसिक कालखंडानंतर ते लुप्त होत असल्याचं आढळलं. पुढे सुपरकॉन्टिनेंट पँजिया इथं डायनासोरची उत्पत्ती झाल्याचेही संदर्भ आढळून येतात. अतीव पर्जन्यामुळं या कथित स्वरुपातील सर्वात जुन्या डायनासोरचे अवशेष जगासमोर आले खरे, पण त्यांना तितकाच धोकाही आहे ही बाब नाकारता येत नाही. या डायनासोरच्या सापळ्यामध्ये सध्या पायाचे आणि शरीराच्या इतर भागांचे अवशेष असून सातत्यानं होणाऱ्या हवामान बदलांचे परिणाम त्यांवरही दिसून येत आहेत. ब्राझिलमध्ये तीन महिन्यांचा पाऊस दोन आठवड्यांतच कोसळल्यामुळं ही परिस्थिती ओढावली, ज्यामध्येच हे अवशेष समोर आल्याचं सांगितलं जातं. डायनासोरचे अवशेष हाती मिळताच अभ्यासक आणि संशोधकांनी त्याचं विघटन थांबवण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या असून, सध्या अतिशय सावधगिरीनं या अवशेषांचं निरीक्षण करत गतकाळातील अनेक रहस्यांचा उलगडा करण्याचं काम सुरू आहे. फेडरल युनिवर्सिटी ऑफ सँटा मारिया येथील रोड्रिगो टेम्प म्यूलर यांच्या नेतृत्त्वाखाली हे संपूर्ण निरीक्षण आणि अध्ययन सुरू असून आता या संपूर्ण अभ्यासातून नेमकं काय निष्पन्न होतं आणि गतकाळातील आणखी कोणही माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

WI
(91.5 ov) 233
(56.2 ov) 201/5
VS
SA
357 (117.4 ov)
173/3 dec (29.0 ov)
West Indies drew with South Africa
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.