Arjun Kapoor Sridevi : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. पण तरी सुद्धा तो त्याच्या कुटुंबाविषयी मोकळेपणानं बोलताना दिसतो. पण त्याची सावत्र आई श्रीदेवी यांच्याविषयी देखील बोलला आहे. अर्जुननं आता श्रीदेवी यांच्याविषयी बोलत असताना त्यांना मॅम म्हटलं आहे. खरंतर, अर्जुन हा सतीश कौशिक यांचा चित्रपट रुप की रानी चोरों का राजा या चित्रपटाविषयी बोलत होता. त्याविषयी बोलताना अर्जुन म्हणाला, माझं संपूर्ण आयुष्य माझ्या वडिलांसोबत रुप की रानी चोरों का राजाच्या सेटवर गेलं आहे. इतकंच नाही तर आजच्या स्टॅडर्ड्सच्या हिशोबानं हा आतापर्यंतचा सगळ्या मोठा चित्रपट होता. या चित्रपटाची कास्टिंग ही 10 कोटींची होती. या चित्रपटात अनिल काका आणि श्रीदेवी मॅम, जग्गू दादा होते. अनुपम खेर यात खलनायकाच्या भूमिकेत होते आणि अनिल काकासोबत कबूतर देखील होतं. ते करेक्टर माझं सगळ्यात आवडतं होतं. दरम्यान, त्यावेळी बोनी कपूर आणि श्रीदेवी हे रिलेशनशिपमध्ये होते. तर, बोनी कपूर हे अर्जुनच्या आईसोबत विवाहीत होते. बोनी यांनी 1996 मध्ये मोना यांना घटस्फोट दिला आणि श्रीदेवीशी त्यावर्षीच लग्न केलं. त्यावेळी अर्जुन हा 10 वर्षांचा होता आणि त्याची बहीण अंशुला ही 5 वर्षांची होती. तर जेव्हा श्रीदेवी यांचं निधन झालं तेव्हा अर्जुन आणि श्रीदेवी यांच्यात चांगले संबंध नसले तरी सुद्धा सावत्र बहिणींना सांभाळत अर्जुन कपूर त्यांच्या पाठी उभा राहिला. त्यानं त्याच्या तिन्ही बहिणींची काळजी घेतली आहे. इतकंच नाही तर अजूनही तो त्यांच्या खासगी आयुष्यात आणि प्रोफेशन्ल आयुष्यात पाठिंबा देण्यासाठी उभा असतो. हेही वाचा : युझवेंद्र चहलशी घटस्फोट घेतला तर धनश्रीला किती पोटगी मिळणार? अर्जुनच्या कामाविषयी बोलायचं झालं तर सगळ्यात शेवटी 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. आता तो लवकरच 'मेरे हसबैंड की बीवी' या चित्रपटात दिसणार आहे. त्या चित्रपटात भूमि पेडनेकर आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 21 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
Popular Tags:
Share This Post:


Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
January 7, 2025What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
Featured News
Tuesday Panchang : आज मंगळवारी शिव योग! हनुमानजी अशी करा पूजा
- By Sarkai Info
- January 7, 2025
मनोज जरांगे पाटील असं बोलले तरी काय? ओबीसी समाज इतका आक्रमक झाला
- By Sarkai Info
- January 6, 2025
Latest From This Week
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
'धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...', सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.