विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असताना संघात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण केला होता. त्याने संघाची उच्च मानकं आणि अपेक्षा दोन्हीही उंचावल्या होत्या. खासकरुन SENA (South Africa, England, New Zealand and Australia) दौऱ्यांमध्ये त्याच्या नेतृत्वातील कामगिरीने लक्ष वेधलं होतं. कठीण परस्थितींमध्येही भारतीय संघ स्पर्धात्मक असावा अशी विराटची अपेक्षा होती. विराट कोहलीने भारतीय संघाला 2018-19 मध्ये पहिली मालिका जिंकण्यात मदत केली होती. पण नंतर 2018 मध्ये इंग्लंडिविरोधात 1-4 ने पराभव झाल्यानंतर त्याची निराशा झाली होती. त्या मालिकेत विराट कोहलीची मानसिकता कशी होती याबद्दल बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) खुलासा केला आहे. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) वरुण धवनला याबद्दल सांगितलं होतं. त्यावेळी विराट आणि अनुष्का एकमेकांना डेट करत होते. रणवीर अलाहबादियाचा पॉडकास्ट 'द रणवीर शो'मध्ये वरुण धवनने हजेरी लावली. यावेळी वरुण धवनने सांगितलं की, "विराटने अनेक अडथळ्यांना पार केलं आहे. जेव्हा तो चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता तेव्हा नेमकी काय मानसिकता होती याबद्दल अनुष्काने माझ्यासह माहिती शेअर केली होती". Guess he's talking about the Edgbaston test 2018. Or maybe from 2021 Eng tour. pic.twitter.com/8SwzOH7PIT — iᴍ_Aʀʏᴀɴ18 (@crickohli18) December 19, 2024 "मला वाटतं ती नॉटिंगहॅम टेस्ट होती. भारत तिथे हारला होता. अनुष्काने सांगितलं की, ती त्या सामन्यात हजर नव्हती. जेव्हा ती परत आली तेव्हा तिला विराट कुठे आहे हे माहिती नव्हतं. ती रुममध्ये आली तेव्हा विराट झोपलेला होता आणि अक्षरश: रडत होता," अशी माहिती वरुण धवनने दिली आहे. वरुण धवन नेमका कोणता कसोटी सामना होता याबद्दल निश्चित नाही. कारण ट्रेंट ब्रिज सामना हा भारताने जिंकलेल्या मालिकेतील एकमेव सामना होता. परंतु इतर पराभवांची अडचण कायम राहिली. धवन पुढे म्हणाला: "त्या दिवशी तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असतानाही, त्याने संपूर्ण परिस्थिती स्वतःवर घेतली, जसं मी अपयशी ठरलो. तो संघाचा कर्णधार होता". 2018 मध्ये अनुष्का शर्माने वरुण धवनसोबत 'सुई धागा' चित्रपटात काम केलं होतं.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
Popular Tags:
Share This Post:
आधी खातेवाटपावरुन आता बंगलेवाटपावरुन मंत्री नाराज? कारणं वाचून डोक्याला मारुन घ्याल हात
December 24, 2024Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
December 24, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
LIVE Updates : संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातून : धनंजय मुंडे
- By Sarkai Info
- December 20, 2024
Featured News
Latest From This Week
ऑस्करच्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर, आता 'अनुजा' कडून अपेक्षा
MARATHI
- by Sarkai Info
- December 20, 2024
अवघ्या 13 गुंठे जमिनीसाठी शेतकऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, धाराशीवमध्ये पवनचक्की गुंडांची दहशत
MARATHI
- by Sarkai Info
- December 20, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.