Ankita Lokhande : आभिनेत्री अंकिता लोखंडेने गुरुवारी आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान यानिमित्ताने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता कीर्तीने एक पोस्ट केली आहे. अंकिताने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिल आहे की "आणि वाढदिवसाची सुरुवात प्रेम, हसणे आणि आशीर्वादाने झाली. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा." अंकिता लोखंडेने शेअर केलेल्या पोस्टवर श्वेता कीर्तीने कमेंट केली आहे. यामध्ये तिने सुशांतचाही उल्लेख केला. "तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डिअर, नेहमी आनंदी आणि निरोगी राहा. भाऊचं (सुशांत सिंह राजपूत) प्रेम आणि आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहे." श्वेता कीर्तीने कमेंटच्या माध्यमातून तिच्या भावना इंस्टाग्रामवर व्यक्त केल्या. अंकिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पति विक्की जैन आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत पूजा करताना दिसत आगे. श्वेता सिंह कीर्ती (Shweta Singh Keerti) आणि अंकिता लोखंडे दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघी सोशल मीडियावर एकमेकांचं समर्थन करताना दिसतात. एकदा 'बिग बॉस 17'मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या उल्लेखावरून अंकिताला खूप ट्रोल केले जात होते. अशा वेळी खास मैत्रिण आणि सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता तिच्या समर्थनार्थ त पुढे आली होती. अंकिताला ट्रोल करणाऱ्यांना तिने खूप सुनावले होते. सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे हे त्यांच्या नात्यामुळे चर्चेचा विषय बनले होते. 2019 मध्ये तिने विक्ती जैन या व्यावसायिकासोबत लग्न केलं. हे ही वाचाः मुंबईतील कॉन्सर्टसाठी महाराष्ट्र सरकारची नियमावली, दिलजीत दोसांझ म्हणाला 'तुम्ही कशाला...' Ankita Lokhande and Sushant Singh Rajput: अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत हे जवळपास 7 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. ते पहिल्यांदा 'पवित्र रिश्ता' च्या सेटवर भेटले होते. तेव्हापासून त्यांचं नातं जुळलं होतं. नंतर 7 वर्षांनी त्यांचा ब्रेकअप झाला होता. एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय शोमध्ये 'अर्चना'ची भूमिका तिने साकारली होती. नंतर अंकिता लोखंडे टीव्ही जगतात एक लोकप्रिय चेहरा बनली. 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाद्वारे तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाचं दिग्दर्शन 'कंगना राणौत'ने केलं होतं. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. याशिवाय बागी 3 आणि सावरकर या चित्रपटांमध्येही ती झळकली आहे.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
Popular Tags:
Share This Post:


Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
January 7, 2025What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
Featured News
Tuesday Panchang : आज मंगळवारी शिव योग! हनुमानजी अशी करा पूजा
- By Sarkai Info
- January 7, 2025
मनोज जरांगे पाटील असं बोलले तरी काय? ओबीसी समाज इतका आक्रमक झाला
- By Sarkai Info
- January 6, 2025
Latest From This Week
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
'धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...', सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.