MARATHI

'व्हाइट गोल्ड'चा हजारो कोटींचा साठा सापडला! श्रीमंत देशाला लागला जॅकपॉट

Saudi Arabia Found White Gold: जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियाचा आर्थिक डोलारा हा देशात सापडणाऱ्या तेल साठ्यांवर अवलंबून आहे. महत्त्वाच्या तेल उत्पादक देशांपैकी एक असलेला सौदी अरेबिया हा नैसर्गिक गॅस निर्मितीमध्येही आघाडीवर आहे. असं असतानाच आता या देशाला नवीन लॉटरीच लागली आहे. या देशाला लागून असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर 'व्हाइट गोल्ड' सापडलं आहे. सौदी अरेबिया सरकारच्या मालकीच्या सौदी अरेबिया अमार्को कंपनीच्या माध्यमातून तेल उत्खनन करताना हे व्हाइट गोल्ड हाती लागलं आहे. या व्हाइट गोल्डला जगभरामध्ये भरपूर मागणी असून आता यामुळे हा देश अधिक श्रीमंत होणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. सौदी अऱेबियातील खाण मंत्रालयाचे उपमंत्री असलेल्या खलिद बिन सालेह अल-मुदैफिर यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. सौदीत सापडलेल्या ज्या व्हाइट गोल्डबद्दल चर्चा केली जात आहे त्याला सामान्य भाषेत लिथियम असं म्हणतात. लकवरच सौदी अरेबियाकडून लिथियमच्या साठ्यांसाठी संयुक्तपणे कार्यक्रम राबवणार असल्याची घोषणा खलिद बिन सालेह अल-मुदैफिर यांनी केली. सौदीमधील खाणाकामासंदर्भात काम करणाऱ्या मॅडेन अॅण्ड अमार्को कंपनीबरोबर देशातील किंग अब्दुल्ला सायन्स आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून लिथियमचे साठे बाहेर काढले जाणार आहेत. यासंदर्भातील माहिती खलिद बिन सालेह अल-मुदैफिर यांनी दिल्याचं 'रॉयटर्स'ने म्हटलं आहे. "नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन ते लिथियमचे साठे बाहेर काढले जाणार आहेत. त्यासाठी किंग अब्दुल्ला सायन्स आणि तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या साऱ्या कामकाजामध्ये हे विद्यापीठ आधीपासूनच सहभागी आहे," असं सौदीतील खाण मंत्रालयाच्या उपमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. नक्की वाचा >> जागतिक मंदीची चाहूल? अमेरिका Shutdown च्या उबंरठ्यावर, कामगारांना सक्तीची रजा! ट्रम्प कनेक्शन उघड तेल साठे असलेल्या जमिनीमध्ये हे लिथियम आढळून आल्याने सामान्य लिथियमपेक्षा इथून अधिक चांगल्या दर्जाचं लिथियम हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच यामधून सौदी अरेबियाला अधिक फायदा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा साठा हजारो कोटींचा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगभरामध्ये अपारंपारिक ऊर्जेचे स्रोत दिवसोंदिवस कमी होथ असतानाच लिथियमकडे भविष्यातील इंधन म्हणून पाहिलं जात आहे. सध्या लिथियम-आयर्न बॅटरींचा जवळपास सर्वच इलेक्ट्रीक उपकरणांना ऊर्जा पुरवठा करण्यासाठी वापरक केला जातो. या बॅटरींमध्ये ऊर्जा साठवून ती वापरली जाते. यात अगदी इलेक्ट्रीक कार, लॅपटॉप, स्मार्टफोन्स, लाइट्स, खेळणी आणि दैनंदिन आयुष्यातील जवळपास सर्वच इलेक्ट्रीक वस्तूंमध्ये केला जातो. जास्त घनता असूनही लिथियम बॅटरी या वजनाने हलक्या असल्याने त्या जगभरातील तंत्रज्ञानसंदर्भातील कंपन्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. या बॅटरी सहज रिचार्ज करता येतात. याच गुणधर्मांमुळे या बॅटरीची मागणी अधिक आहे.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.