MARATHI

LED DRL, कमाल मायलेज आणि दमदार लूक; कशी काय वाटली 'ही' फॅमिली कार?

Auto News : एसयुव्ही कार खरेदीचं प्रमाण मागील काही वर्षांमध्ये वाढलं असून भारतीय रस्त्यांच्या अनुषंगानं बऱ्याच कुटुंबांकडून कार खरेदी करताना SUV मॉडेलला पसंती दिली जाते. येत्या काळात एसयुव्ही खरेदीच्या विचारात असणाऱ्यांसाठी आता एक नवं मॉडेल या शर्यतीत दाखल झाल असून त्या मॉडेलचं नाव आहे सिट्रोएन (Citroen India). कंपनीकडून या कारचं नवं मॉडेल भारतात सादर करण्यात आलं असून, या कारची निर्मिती प्रक्रिया पूर्ण झाल्याचं सांगितलं जात आहे. इतकंच नव्हे, तर ऑगस्ट महिन्यात ही कार अधिकृतरित्या लाँच केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार सिट्रोएन बेसॉल्टला अत्याधुनिक फिचर्स देण्यात आलं असून सिट्रोएन सी3 एयरक्रॉस (Citroen C3 Aircross)सोबत तिचा लूक बराच मिळताजुळता आहे. या कारमध्ये कंपनीनं LED DRLs सह स्लिप्ट ग्रिल दिलं आहे. नव्या पद्धतीनं कारचं बंपर डिझाईन करण्यात आलं असून, त्यामध्ये ड्युअल टोन फिनिश एलॉय व्हील्स आणि सोबत मागच्या बाजूला रॅपअराऊंड एलईडी टेल लाईट्स देण्यात आल्या आहेत. कमाल एसी वेंट आणि लक्ष वेधणारा डॅशबोर्ड देण्यात आलेल्या या कारमध्ये पांढरा लेदरेट अपहोल्स्ट्री आणि रिअर हेडरेस्ट देण्यात आला आहे. त्याशिवाय ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 6 एअरबॅग, 10.25 इंचांचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल, इलेक्टॉनिक एडजस्टेबल ओवीआरएम, क्रूज कंट्रोल आणि 470 लीटरचा बूट स्पेस देण्यात आला आहे. कारच्या इंजिनविषयी सांगावं तर, 1.2 लीटरचं नॅचुरल एस्पिरेटेड इंजिन देण्यात आलं असून, त्यात 1.2 लीटरचं टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. या कारमधील इंजिन 82 पीएसच्या ताकदीसह 115 एनएम इतका टॉर्क जनरेट करतो. ही कार येत्या काळात टाटा कर्व (Tata Curvv) आणि ह्युंडई वेन्यू (Hyundai Venue) यांसारख्या कारना आव्हान देणार आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.