MARATHI

Govt Job: आयकर विभागात नोकरी, 1 लाख 42 हजारपर्यंत मिळेल पगार

Govt Job: सरकारी नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण अनेकदा नोकरीबद्दलची माहिती बहुतांश व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही. सध्या केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या आयकर विभागामध्ये भरती सुरु आहे. याअंतर्गत नोकरी मिळालेल्या उमेदवारांना 1 लाख 40 हजारच्या वर पगार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी उमेदवारांकडून कोणती लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. आयकर विभागाच्या या भरती अंतर्गत प्रोसेसिंग असिस्टंट ग्रेड बीची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीद्वारे प्राप्तिकर विभागात एकूण 8 रिक्त पदे भरली जाणार आहेत. आयकर विभागात प्रोसेसिंग असिस्टंट ग्रेड बी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेली संबंधित पात्रता पूर्ण केली असणे आवश्यक आहे. त्यानंतरच ते अर्ज करण्यास पात्र मानले जातील. आयकर विभागात निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल 7 अंतर्गत पगार दिला जाणार आहे. म्हणजेच उमेदवारांना दरमहा 44 हजार 900 ते 1 लाख 42 हजार 400 रुपये पगार दिला जाईल. आयकर विभागात नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक वयोमर्यादा जाणून घेऊया. आयकर विभाग भरती 2025 साठी 56 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतील. आयकर विभागाच्या या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज भरावा लागेल आणि संबंधित कागदपत्रांसह आयकर संचालनालय (प्रणाली),केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, तळमजला, E2,एआरए केंद्र, झंडेवालान विस्तार. या पत्त्यावर पाठवावा लागेल. बॅंक ऑफ बडोदाच्या विविध शाखांमध्ये 1267 पदे भरली जाणार आहेत. बँक ऑफ बडोदा स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर अर्ज करता येणार आहे. यानंतर होम पेजवर 'करिअर्स' टॅबवर क्लिक करा. नवीन पेज ओपन झाल्यावर 'करंट ओपनिंग्ज' टॅबवर क्लिक करा. 'रिक्रूटमेंट ऑफ प्रोफेशनल्स ऑन रेग्युरल बेसिस ऑन वेरीयस डिपार्टमेंट' या लिंकवर क्लिक करा. नवीन पेज ओपन होईल. यानंतर स्वतःची नोंदणी करा आणि तुमचा अर्ज भरा.बँक ऑफ बडोदा भरतीसाठी अर्ज शुल्क भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.अर्जाची प्रिंटआउट घ्या.बँक ऑफ बडोदा एसओ भर्तीसाठी अर्ज करण्यासाठी बीओबी अर्जाच्या लिंकवर क्लिक करा. बँक ऑफ बडोदाची अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर यासंदर्भातील तपशील देण्यात आला आहे. 17 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी कोणताही विलंब न लावता त्वरीत नोंदणी करून घ्यावी.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.