MARATHI

सकाळच्या नाश्त्याला बनवा हेल्दी; बाजरीपासून बनवा 'हा' हलका आणि सोपा पदार्थ

बाजरी हे एक पोषणतत्वाने भरपूर असलेले अन्न आहे, जे शरीराला अनेक फायदे देतं. थंडीच्या सीझनमध्ये बाजरीचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरते. यामध्ये असलेल्या फायबर्स, मिनरल्स आणि प्रथिनांमुळे शरीराचे संरक्षण होते आणि पचन क्रिया सुधरते. म्हणूनच रोजच्या नाश्त्यात पोहे किंवा उपमा ऐवजी बाजरीचे इडली बनवून तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात एक हेल्दी व वेगळा पर्याय समाविष्ट करू शकता. बाजरीची इडली – एक चविष्ट आणि फायदेशीर नाश्ता बाजरीची इडली लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. या इडलीची चव चांगली असतेचं पण त्यासोबतच ते शरीराला फायबर्स, प्रथिने आणि महत्वाचे मिनरल्स देखील पुरवते. यामुळे ही इडली आरोग्यासाठी चांगली ठरते. खास करून थंडीच्या काळात बाजरीचा अधिक वापर केला जातो कारण ती शरीराला उब आणि ऊर्जा देते. बाजरीची इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1. 1 कप बाजरी 2. 1 कप ताक 3. मीठ (चवीनुसार) 4. 1 टीस्पून मिरपूड 5. इनो किंवा खायचा सोडा बाजरीची इडली कशी बनवावी? 1.बाजरी भिजवणे: सर्वात प्रथम, बाजरी 2 तासांसाठी ताकामध्ये भिजवून ठेवा. ताकामुळे बाजरीमध्ये एक नवी चव येते, तसेच बाजरी चांगली मऊ आणि हलकी होते. 2. मिश्रण तयार करणे: दोन तासांनी बाजरी भिजवली की, त्यात चवीसाठी मीठ आणि मिरपूड घाला. आता त्यामध्ये काळी मिरी देखील घालता येते, ज्यामुळे स्वादात एक वेगळी तिखट चव येईल. 3. मिक्सरमध्ये बारिक करणे: हे मिश्रण मिक्सर मध्ये चांगले बारिक वाटून घ्या. वाटताना मिश्रण फार पातळ किंवा जाड होऊ नये, त्यामुळे इडली मऊ आणि फुगलेली होईल. 4. इनो किंवा सोड्याचा वापर: बॅटर मध्ये सोडा किंवा इनो घालून चांगले मिक्स करा. यामुळे इडल्या हलक्या आणि फुललेल्या बनतात. 5. इडली स्टीमिंग: इडली बनवण्यासाठी इडली पात्राला तेल लावून घ्या. नंतर तयार केलेल्या बॅटरला इडलीच्या ताटांमध्ये ओतून १५-२० मिनिटे स्टीम करा. 6. सर्व्ह करणे: इडली शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि गरमागरम इडली आपल्या आवडीनुसार सांबार किंवा चटणीसोबत सर्व्ह करा. पोषणतत्त्वांसह संपूर्ण कुटुंबासाठी एक हेल्दी नाश्ता तयार आहे. सकाळी ताज्या आणि हेल्दी नाश्त्यानी सुरूवात केल्याने संपूर्ण दिवसभर ऊर्जा आणि ताजेतवाने राहतो. बाजरीपासून बनवलेली इडली तुमच्या नाश्त्यात एक वेगळा आणि पौष्टिक बदल घेऊन येते. ती लहान मुलांसाठीदेखील चांगली आहे कारण त्यात फायबर्स आणि प्रथिनांचे भरपूर प्रमाण आहे, जी शरीराची वाढ आणि विकास सुधारते. त्यामुळे तुमच्या रोजच्या नाश्त्याला एक पौष्टिक, स्वादिष्ट आणि हेल्दी वळण देण्यासाठी बाजरीची इडली नक्की ट्राय करा.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.