MARATHI

जय शाहंच्या जागी कोण होणार BCCI चे नवे सचिव? भाजपच्या दिग्गज नेत्याचं नाव समोर

BCCI Jay Shah: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी (ICC Secretary) वर्णी लागणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसी अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट आहे. त्याआधी जय शहा अध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. जय शाह रचणार इतिहास जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली तर त्याचा प्रभाव बीसीसीआयवर (BCCI) पडणार आहे. बीसीसीआयचे सचिव म्हणून जय शहा यांचा एक वर्षाचा कार्यकाळ अद्याप बाकी आहे. आयसीसी अध्यक्ष बनल्यानंतर बीसीसीआयमध्ये चार वर्ष ते कोणतंही पद भूषवू शकत नाहीत. 35 व्या वर्षीचे जय शाह आयसीसीच्या इतिहासातील सर्वात कमी वय असणारे अध्यक्ष बनू शकतात. आता प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे जय शाह आयसीसीचे अध्यक्ष बनले तर बीसीसीआयमध्ये त्यांच्या जागी सचिव म्हणून कोण जबाबदारी सांभाळणार? दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते अरुण जेटली (Arun Jaitley) यांचे पूत्र रोहण जेटली (Rohan Jaitley) यांचं नाव सचिव पदासाठी सर्वात आघाडीवर आहे. रोहण जेटली हे बीसीसीआयचे पुढचे सचवि बनणार अशी जोरदार चर्चा आहे. रोहण जेटली हे सध्या दिल्ली जिल्हा क्रिकेट संघाचे (DDCA) अध्यक्ष आहेत. जय शाह यांची आयसीसीमध्ये वर्णी लागली तरी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉयर बिन्नी आणि इतर अधिकारी मात्र आपापल्या पदावर कायम असतील. त्यांचा कार्यकाळ संपायला अद्याप एक वर्ष बाकी आहे. जय शाह यांच्याकडे किती मतं? आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी जय शाह यांनी अर्ज केल्यास त्यांच्याकडे 16 पैकी 15 आयसीसी बोर्ड मेंबर्सची मत आहेत. अध्यक्ष बनण्यासाठी केवळ 9 मतांची गरज असते. त्यामुळे त्यांची निवड ही केवळ औपचारीक बाब असेल. पण जय शाह हे आयसीसी अध्यक्ष बनण्यासाठी तयार आहेत का याबाबत मात्र अद्याप सस्पेन्स आहे. रोहण जेटली यांचा मजबूत दावा रोहण जेटली हे भाजपचे माजी नेते अरुण जेटी यांचे पूत्र आहेत. अरुण जेटली यांचा बीसीसीआयमध्ये चांगला प्रभाव होता. त्यामुळे रोहण जेटली यांचीही बीसीसीआयवर मजबूत पकड आहे. क्रीडा प्रशासक म्हणून त्यांना बराच अनुभव आहे. दिल्ली प्रीमिअर लीगच्या आयोजनासाठीही रोहण जेटली यांनी दावा सांगितला आहे. आयसीसीच्या अध्यक्षपदी चार भारतीय आयसीसीच्या अध्यक्षपदाची धुरा आतापर्यंत चार भारतीयांनी सांभाळली आहे. जगमोहन दालिया (1997-2000), शरद पवार (2010-2012), एन श्रीनिवासन (2014-15 ), आणि शशांक मनोहर ( 2015-2020).

CAN
35/5
(8.3 ov)
VS
NED
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.